ब्रेकिंग न्यूज :
भारत

माजी नायब तहसीलदार जोरवर ‘मिलेनियम फार्मर ऑफ इंडिया’ पुरस्काराने गौरव

Blog Image
एकूण दृश्ये: 59

माजी नायब तहसीलदार जोरवर ‘मिलेनियम फार्मर ऑफ इंडिया’ पुरस्काराने गौरव

    अकोले ( भारत रेघाटे )

तालुक्यातील देवठाण येथील प्रगतीशील शेतकरी एकनाथ जोरवर यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील मिलेनियम फार्मर ऑफ इंडिया हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय कृषी संशोधन संस्था (आयसीएआर) व कृषी जागरण यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

सेवानिवृत्त नायब तहसीलदार असलेले एकनाथ जोरवर यांनी जैविक व रसायनमुक्त शेतीत नवनवीन प्रयोग करत उत्पादन परदेशात निर्यात केले आहे. बायोमी टेक्नॉलॉजी कंपनी कडून त्यांनी ऑर्गेनिक शेतीचे प्रशिक्षण घेतले असून डॉ. प्रफुल्ल घाडगे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. कार्यक्रमास देश विदेशातील कृषी तज्ज्ञ व शास्त्रज्ञ उपस्थित होते.

शिक्षणाशिवाय जीवन अधू आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर