ब्रेकिंग न्यूज :
भारत

बाब्बो ! अकोले कोतुळात एवढा घातक साठा ! कोतूळ मध्ये एक कोटी एक लाख 74,350 गुटख्यासहीत सात वाहने तेरा मोबाईल रोख 75,350 बारा आरोपी अटक ; पीओ पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांचे धडाकेबाज कारवाई

Blog Image
एकूण दृश्ये: 142

बाब्बो ! अकोले कोतुळात एवढा घातक साठा ! कोतूळ मध्ये 1 कोटी 1 लाख 74,750 गुटख्यासहीत सात वाहने तेरा मोबाईल रोख 75,350 बारा आरोपी अटक ; पीओ पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांचे धडाकेबाज कारवाई

    अकोले कोतूळ  (भारत रेघाटे)

तालुक्यातील कोतुळ परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने टापा छापा टाकत तब्बल एक कोटी, एक लाख रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या कारवाई मध्ये कोतूळ, अकोले, समशेरपुर, येथील तब्बल बारा आरोपींना अटक करण्यात आली आहे असून त्यांच्याकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. अकोले तालुक्यातील आतापर्यंतच्या कारवाईमधील सर्वात मोठी कारवाई समजली जाते.

ग्रामीण भाग असलेल्या कोतूळ परिसरात एका पत्राच्या शेडमध्ये एवढा मोठ्या प्रमाणात गुटखा साठा करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने धाड टाकत हिरा 110 पोते 46,46,400 रॉयल 717 सुगंधी तंबाखू 50 पोते 10,56,000 वाहने सात 42,50,000 मोबाईल 13 1,47,000 रोख 75,350असा 1 कोटी, 1 लाख, 74 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलीस पथकाला यश आले. सदरची कारवाई आज रविवार दिनांक 13 जुलै 2025 रोजी दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान करण्यात आली. या कारवाईमध्ये नगर येथून संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाचा जथ्था कोतूळ मध्ये तैनात करण्यात आला होता.

या कारवाई मध्ये  मुख्य आरोपी शोहेब शाबिद काझी साहिद हुसेन लतीफ पटेल, मतीन शबीर शेख ,शहा नवाज जावेद काझी, परवेज युनूस शेख ,शाहरुख जावेद काझी जुबेर युसुफ शेख, इम्रान रौफ शेख सर्व राहणार कोतुळ, साद अनवर शेख समशेरपूर सादिक पठाण, अमोल शरद जाधव अकोले, या आरोपींना अटक करण्यात आली असून अकोले तालुक्यातील कोतूळ परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होणे फारच गंभीर बाब असून  याबाबतची माहिती नगर पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना मिळाली होती. यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचत एका पत्र्याच्या शेडमध्ये धाड टाकून एक कोटी एक लाख 75 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

----- Advertisements -----

या पथकामध्ये दिगंबर काले, शंकर चौधरी, राजेंद्र वाघ, अजय साठे, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, उमेश खेडकर, सुनील दिघे, सुनील पवार, अमोल कांबळे, मल्लिकार्जुन बनकर, आदि पथकाने ही कारवाई केली. अकोले शहर पोलीस ठाण्यात सदर कारवाईबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रमाशिवाय फळ मिळत नाही.

लोकमान्य टिळक