*अकोल्यात राडा ; शहर हादरले* टेकडीवरच दोन गट एकमेकास भिडले; तब्बल 19 जणांवर विविध गुन्हे दाखल*
अकोले { प्रतिनिधी }
शहरातील पानसरवाडी येथील टेकडीवर दोन गटात धुमश्चक्री होऊन जोरदार मारपीट झाल्याने या प्रकरणी अकोले शहर पोलिसात दोन गटातील तब्बल 19 जणांवर समांतर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेने पानसरवाडीसह अकोले शहर चांगलेच हादरून गेले आहे. घडलेल्या घटने बाबत शहर आणि परिसरात उलट सुलट चर्चेला मात्र चांगलेच उधान आले आहे.
या बाबत हकीकत अशी आहे की, आमच्या विरोधात तहसील कार्यालयात तक्रार देत़ो का ? त्याचा राग मनात धरून वचपा काढत फिर्यादी शरद सखाराम पानसरे (49 ) यास तब्बल दहा जणांनी 17 फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान शरद सखाराम पानसरे हा भांडणे सोडविण्यास गेल्याने दहा जणांनी त्यास लाथा बुक्या मारून शिवीगाळ गेली. याप्रकरणी 18 फेब्रुवारीला पाच वाजता शरद पानसरे (49 )अगस्ती नगर पानसरवाडी याने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सुनील सुर्यभान पानसरे, अर्जुन नथू पानसरे, दिनेश गोविंद पानसरे, संपत चंद्रभान पानसरे, शुभम सुनील पानसरे, सागर रोहिदास पानसरे, सचिन सुनील पानसरे, अभिषेक संपत पानसरे, सार्थक गोपिनाथ पानसरे,प्रसाद शरद सुरशे सर्व पानसरवाडी अकोले यांच्या विरोधात जबर मारहाण तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी. सदर फिर्यादीवरून अकोले पोलीसात भारतीय न्याय सहिता 189 (1), 189 (2), 190, 115 (2), 352, 351 (2) (3) प्रमाणे विविध कलमाव्दारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तर दुसरीकडे दिनेश गोविंद पानसरे 41 अगस्ती नगर पानसरवाडी हा भांडण सोडवा सोडवा करणाऱ्यांमध्ये गेला त्याचा राग मनात धरून तब्बल नऊ जणांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी फिर्यादी दिनेश गोविंद पानसरे यांनी शहर पोलिसात आरोपी परशुराम बाळचंद शेळके, शरद सखाराम पानसरे, रोहिदास लक्ष्मण पानसरे, अशोक सखाराम पानसरे, समीर दिगंबर नाईकवाडी, अक्षय प्रदिप पानसरे, दिगंबर विठ्ठल नाईकवाडी, सुशांत शरद पानसरे, सुरेश बाळचंद शेळके (सर्व रा. पानसरवाडी अकोले, यांनी दिनेश गोविंद पानसरे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तू आमच्या विरुद्ध तहसील कार्यालयात तक्रार देतो काय ? तू कोठेही दिसला तर तुला जीवे मारुन टाकू अशी धमकी दिल्याने तब्बल 9 जणांविरूध्द तक्रार दाखल केली. फिर्यादी वरून अकोले पोलिसात भारतीय न्याय सहींता 189 (1), 189 (2), 190, 115 (2), 352, 351 (2) (3) प्रमाणे परस्पर विविध कलमाव्दारे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
दुसऱ्या व्यक्तीच्या भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याने एका गटाने दुसऱ्या गटावर जबर मारहाण केली. या घटनेने अकोले शहरातील वातावरण चांगलेच पेटल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणी दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याने अकोले शहर पोलिसात विविध कलमांर्तगत तब्बल 19 जणांवर परस्पर गुन्हे करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शखाली हेड काँस्टेबल महेश आहेर करीत आहेत.