ब्रेकिंग न्यूज :
गुन्हेगारी

अकोले ग्रामीण मध्ये तणाव; शुल्लक कारणावरून दिराने केला भावजयीचा खून

Blog Image
एकूण दृश्ये: 366

अकोले ग्रामीण मध्ये तणाव; शुल्लक कारणावरून दिराने केला भावजयीचा खून

     अकोले { प्रतिनिधी }

एका मावस दिराने दारूच्या नशेत किरकोळ भांडणाचा राग काढत एका महिलेवर टणक हत्यारांने जबर मारहाण करून आपल्याच भावजयीचा खून केल्याची घटना अकोले शहरातील उंच खडक येथे घडल्याने या घटनेने संपूर्ण अकोले परिसरच पुन्हा एकदा हादरून गेला आहे. 

याबाबत हकीकत अशी आहे की, गुरूवार दिनांक 20/02/2025 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास आरोपी राजू शंकर कातोरे वय 45 या दिराने दारू पिऊन नशेत किरकोळ भांडणाच्या कारणावरून जिजाबाई शिवराम खोडके वय (45  )हिला जबर मारहाण केली या मारहाणीत जिजाबाई शिवराम घोडके राहणार बोरीचीवाडी पोस्ट गर्दनी हल्ली राहणार उंच खडक बुद्रुक तालुका अकोले, या महिलेला आपले प्राण गमवावे लागले.

सदरची घटना अकोले शहरातील उंच खडक येथील भाऊसाहेब आनंदा देशमुख यांच्या शेतातील शेडमध्ये उंच खडक बुद्रुक येथे घडली आहे. फिर्यादी सुनील शिवराम खोडके वय (24 ) धंदा मजुरी राहणार बोरीचीवाडी पोस्ट गर्दनी हल्ली राहणार उंच खडक बुद्रुक तालुका अकोले यांने शहर पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादीवरून आरोपी राजू शंकर कातोरे वय 45 राहणार बोरीचीवाडी पोस्ट गर्दनी तालुका अकोले यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलीस हुसेन शेख यांनी भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे हे करीत आहेत.

आपण जे विचार करतो, ते आपण होतो.

भगवद्गीता
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin