साहित्य

ज्येष्ठ साहित्यिक हेरंब कुलकर्णीचा होणार सन्मान ; दिनकर साळवे स्मृती पुरस्कार जाहीर

Blog Image
एकूण दृश्ये: 89

ज्येष्ठ साहित्यिक हेरंब कुलकर्णीचा होणार सन्मान ; दिनकर साळवे स्मृती पुरस्कार जाहीर 

    संगमनेर 

 

सुजात फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा ज्येष्ठ कवी, विचारवंत दिनकर साळवे स्मृती पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांना जाहीर झाल्याची माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष के.जी.भालेराव यांनी दिली. हा पुरस्कार लेखक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता अशा निकषाने दिला जातो. हेरंब कुलकर्णी यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान लेखन व्याख्याने याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड समितीचे प्रा. डाॅ. मिलींद कसबे, प्रा.डाॅ. राहूल हांडे, प्रा.गंगाधर अहिरे यांनी निवड केली आहे. हा पुरस्कार रविवार दि.९ मार्च ला सायं.६.३० वा. व्यापारी असोसिएशन हाॅल संगमनेर या ठिकाणी ज्येष्ठ कवी, लेखक, माजी आमदार लहू कानडे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे माजी आमदार डॉ.सुधीर तांबे असणार आहेत. यावेळी संयोजन समितीचे सूर्यकांत शिंदे, लेखक संदीप वाकचौरे, जिजाबा हासे, सुखदेव मोहिते, सुखदेव इल्हे, राजीव साळवे, अरविंद सांगळे, अशोक रुपवते, मेजर सुभाष ब्राम्हणे, सचिन साळवे, बंटी यादव, विनोद गायकवाड रवींद्र दिवे, निलेश कुसरे, दीपक वाघमारे आदी उपस्थित राहणार आहेत. 

 [या दिग्गजांना केले सन्मानित]

यापूर्वी हा पुरस्कार लेखक, सामाजिक कार्यकर्ते किसन चव्हाण (शेवगाव), सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत प्रा.गंगाधर अहिरे (नाशिक), ज्येष्ठ नाटककार डॉ. सोमनाथ मुटकुळे (संगमनेर) यांना देण्यात आला आहे.]

----- Advertisements -----

यशस्वी माणूस तोच, जो प्रत्येक संकटाला संधी म्हणून पाहतो.

अज्ञात
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin