ब्रेकिंग न्यूज :
भारत

अज्ञात वाहनाने एकास उडविले; युवक जागीच ठार

Blog Image
एकूण दृश्ये: 147

अज्ञात वाहनाने एकास उडविले; युवक जागीच ठार

    नाशिक प्रतिनिधी‌

मुंबई आग्रा ब्रिजवर एका अज्ञात वाहनाने दुचाकी चालकास पाठीमागून जोराची धडक दिल्याने एक युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली.

याबाबत घडलेली हकीकत अशी की, बुधवार दि. 18 जून रोजी रात्री दीडच्या सुमारास  मंगेश माधवराव नगरकर वय 38 हे आपल्या कंपनीचे काम उरकून घरी निघाला होता. मुंबई आग्रा रोडने विल्होळी कडून नाशिकच्या दिशेने ओव्हर ब्रिज़वळ गेटवे हॉटेलच्या समोर हा अपघात झाला. या अपघातात मंगेश माधव नगरकर (वय 38) क्रांतीनगर पंचवटी नाशिक सध्या राहणार महाराणा प्रताप पुतळया जवळ यास दुर्दैवाने प्राणास मुकावे लागले. अती वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने मंगेशच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोटर सायकलसह चालक मंगेश हा दूरवर फेकला गेला. मंगेशच्या डोक्यास, तोंडास गंभीर दुखापत झाल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

----- Advertisements -----

मंगेश याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम. एच. 15 डी.पी. 3746 या गाडीचेही मोठे नुकसान झाले. याबाबत दीपक विठ्ठल जगताप वय 36 यांनी फिर्याद दिली. फिर्यादी वरून अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात अंबड पोलीसात गुन्हा रजिस्टर नंबर 405 2025 भारतीय न्याय संहिता कलम 106, (1 ) 125 (बी ) 281, 324 ( 4 ) मो .वा. का. कलम 134, 177, 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास पोलीस सोमनाथ झोले करीत आहेत. मंगेशच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले आहेत.

संपत्तीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे.

शिवाजी महाराज
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin