नानापेठेत टोळीयुद्ध ; अंतर्गत संघर्ष, गोविंद कोमकरची चार गोळ्या घालून हत्या ; पुणे हादरले पोलीस मारेकऱ्यांचा घेतात शोध ; दोन अज्ञात मारेकऱ्यांचा समावेश, पथके रवाना
पुणे प्रतिनिधी
नानापेठेत गँगवारच्या घटनेने एका जणाची गोळ्या घालून हत्या झाल्याचा घटना समोर आली आहे. या घटनेने नाना पेठेसह पुणे हादरून गेले. वनराज आंदेकर हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी मारेकऱ्यांच्या 19 वर्षाच्या मुलावर गोळ्या घातल्याचा प्रकार समोर आला. एकीकडे विसर्जनाची सुरूवात होत असतांनाच नानापेठेत वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष ऊर्फ गोविंदचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता.

आयुष उर्फ गोविंद कोमकर यांची या घटनेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील नाना पेठेत २० वर्षीय तरुणाची गोळ्या घालून हत्या झाल्याचे गुन्हे शाखेचे डीसीपी निखिल पिंगळे यांनी सांगितले., सदरची घटना शुक्रवार दि. ५ ला संध्याकाळी ७:३० ते ७.४५ दरम्यान घडली. आयुष ऊर्ट्यूफ गोविंद हा ट्यूशनवरून परतत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे सहा पथके तयार करण्यात आली असून ती रवाना करण्यात आली आहेत.

घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला .हल्लेखोरांनी तरुणावर बेछूट चार गोळ्या झाडल्या असल्याचे समजते. या हल्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. गणेश कोमकर हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी होता. या घटनेमुळे पुणे शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील मारेकऱ्यांचा मागावर पोलीस निघाले असून त्याचा शोध घेत आहे.

या घटनेत कुख्यात गुन्हेगार गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद कोमकर हा गोळीबारात ठार झाला. त्याचा रक्तरंजीत सूड घेण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी गोविंदवर तीन चार बेछूट गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात दहशत आणि तणाव पसरला आहे. या हत्येमागे जुन्या टोळीयुद्धाचा संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
एक वर्षापूर्वी झाली होती हत्या
वनराज आंदेकरची हत्या झाली त्या घटनेस एक वर्षाचा कालावधी उलटून जातो न जातो तोच दुसऱ्या हत्येचा कट उघडकीस येतो.. पोलिसांनी या घटनेतील तब्बल २० ते २५ हल्लेखोरांना अटक केली होती. त्यांच्यावर मोका लावला गेला होता. अद्यापही हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. नुकतेच या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असताना दत्ता काळे नामक एकाला पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार टिपू पठाण टोळीने काही साहित्य पुरविल्याचे समोर आले. यामुळे या टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक देखील केली.
अवश्य पहा "नवरदेव" चित्रपट शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाची गंभीर समस्या निर्माता दिग्दर्शक निरंजन देशमुख

सोमवार पेठेतून दोनच दिवसापूर्वी केली होती अटक
वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीला पिस्तुले पुरविल्याच्या संशयावरुन गुंड टिपू पठाण टोळीतील दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने सोमवार पेठेतून दोनच दिवसापूर्वी अटक केली होती, खून करण्याची योजना फसली असल्याचे लक्षात येताच नवीन योजना आखली गेली. त्यामध्ये दोन मारेकरी यांनी गोळ्या झाडून ते फरार झाल्याचे वृत्त आहे. त्यासाठी काही पथके तयार करण्यात आली असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
गॅंगवारने वाढवली पोलिसांची डोकेदुखी
पुण्यात एकीकडे गणपती विसर्जन तयारीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असताना, मागील घटनेचा काटा काढण्यासाठी सायंकाळी १९ वर्षीय आयुष या युवकाची चार गोळ्या घालून हत्या केली जाते. तैनात असलेल्या फौज फाटा नाना पेठेसह चारी दिशेला पथकासह रवाना केला गेल्याने पोलीस यंत्रणेची चांगलीच डोकेदुखी वाढल्याचे दिसून येत आहे.

