ब्रेकिंग न्यूज :
भारत

'अस्तित्व'च्या रोहिणी हामकर ची ज्योतिष प्रवीण परीक्षेत सफलता

Blog Image
एकूण दृश्ये: 114

'अस्तित्व'च्या रोहिणी हामकर ची ज्योतिष प्रवीण परीक्षेत सफलता

        पुणे { भारत रेघाटे }

नुकत्याच झालेल्या ज्योतिष्य प्रवीण परीक्षेत अस्तित्व वास्तू ज्योतिषाच्या संचालिका रोहिणी हामकर यांनी ८८ % गुणांकाने सफलता प्राप्त केली आहे. 

    पुणे येथील फल ज्योतिष अभ्यास मंडळ संस्था थेथून रोहिणी हामकर यांनी ज्योतिष प्रवीणची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. संस्थेचे प्रमुख श्री श्री कृष्ण जकातदार ज्योतिषाचार्य, ज्योतिष भास्कर यांच्याकडून सायकल यांना प्रमाणपत्र देण्यात आले. वर्गामध्ये पहिल्या ५ मध्ये रोहिणी यांनी हा क्रमांक पटकावल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. रोहिणी हामकर यांनी लिहिलेला "ज्योतिष शास्त्र- एक अंधश्रद्धा की विज्ञान" या निबंधाचे कौतूक होत असून रोहिणी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

            लहानपणा पासूनच त्यांना शिक्षणाची आवड आणि जिज्ञासू स्वभाव असल्यामुळे इतरापेक्षा काही तरी वेगळे करून दाखवण्याची खूणगाठ त्यांनी आपल्या मनाशी बांधली होती. स्वतः शास्त्र शाखेच्या विद्यार्थिनी असल्यामुळे भविष्य आणि ज्योतिष याबद्दल विशेष कुतूहल त्यांना होतं. परंतु अंधश्रद्धे वरती विश्वास न ठेवता ज्योतिषशास्त्राचा विशेष अभ्यास करून याबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा आणि मानसिकता त्यांची होती.

----- Advertisements -----

          त्यांनी कोरोना काळात अनेक ज्योतिषशास्त्रा वरील पुस्तकांचा अभ्यास करून 2024 मध्ये पुण्यातील नामावंत फल ज्योतिष अभ्यास मंडळ संस्था येथे प्रवेश मिळवला. ज्योतिष भास्कर श्री.श्री कृष्ण जकातदार यांनी १९५८ मध्ये स्थापन केलेल्या संस्थेमधून, नुकतीच ज्योतिष प्रवीण या वर्गामध्ये ८८% मार्क मिळवून पहिल्या पाच क्रमांकामध्ये स्थान पटकावले. रोहिणी ह्या "अस्तित्व" वास्तू ज्योतिष्य च्या संचालिका आहेत. त्या सोशल मीडियावर देखील खूप ऍक्टिव्ह असतात. याच माध्यमातून हिंदू संस्कृती, व्रतवैकल्य, धार्मिक तसेच सामाजिक विषयावर सर्व सामान्य वर्गाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवरती शास्त्रीय उत्तरे शोधून त्या मार्गदर्शन करतात. तसेच ठोस माहिती देत तो पुरवण्याचा प्रयत्नही त्या करत असतात.

        इंस्टाग्राम वर एक लाख 22 हजार फॉलोवर्स आहेत. तसेच युट्युब वरती एक लाख फॉलोवर्स नुकतेच त्यांनी पूर्ण केले आहेत. रोहिणी यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन पुणे रेडिओ सिटी ९१.१ fm वर २०२४ मध्ये मुलाखत प्रक्षेपित झाली. जिद्द चिकाटी आणि सर्व कौटुंबिक जबाबदारी सांभाळून त्यांनी त्यांच्या आवडीच्या विषयात आज प्रगती केली आहे.

श्रीमती हामकर ह्या एमेस्सी बी एड असून त्यांनी १४ ते १५ वर्ष प्राध्यापक म्हणून नोकरी केलेली आहे. आता त्या ज्योतिषी, अंकशास्त्रज्ञ, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावशाली मार्गदर्शन करतात. त्यांचा व्यवसय भरभराटीस आलेला असून अनेक महिलांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले असून त्या सातत्याने यामये अग्रेसर असतात. नामांकित कंपन्याकडूनही रोहिणी हामकर यांचे प्रॉडक्ट विकले जात असल्याने त्याचे नाव सर्वदूर पोहोचले आहे.

समजूतदारपणा ही जीवनाची खरी शिकवण आहे.

संत तुकाराम