ब्रेकिंग न्यूज :
भारत

चिमुरडीवर ॲसिडसदृश हल्ला ; विकृतांचा हैदोस, तालुका संतप्त! आरोपी मोकाटच ;

Blog Image
एकूण दृश्ये: 103

चिमुरडीवर ॲसिडसदृश हल्ला ; विकृतांचा हैदोस, तालुका संतप्त! आरोपी मोकाटच ;          आमदार खताळांनी पीडित मुलगीला आर्थिक मदतीसाठी मागणीतपासासाठी दहा पथके रवाना पोलिसांचे  नागरिकांना आवाहन  हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचा रास्ता रोको

      संगमनेर ( प्रतिनिधी )

पत्ता विचारण्याचा बहाणा करत क्षणार्धात १३ वर्षीय निरागस चिमुरडीवर ॲसिडसदृश पदार्थ फेकून भ्याड हल्ला केल्याची घटना वडगाव पान येथील हाडकी ओढा परिसरात मंगळवार (दि. १७) रोजी सकाळी ११ ते १२ च्या सुमारास घडली. घडलेल्या या संतापजनक घटनेने संगमनेर तालुका हादरला आहे. हल्ल्यानंतर आरोपी दुचाकीवरून सुसाट फरार झाले असून अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या अमानुष प्रकारात चिमुरडीच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या असून तिला तातडीने लोणी पीएमटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अहवालानुसार सदर पीडित सुमारे ४ ते ५ टक्के भाजली असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीसात भारतीय न्याय संहिता कलम 124 (1) व 126 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींचा ठावठिकाणा लागत नाही. आरोपी कधी सापडणार ? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. असून पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.निरपराध चिमुरडीवर झालेला हा हल्ला म्हणजे विकृत मानसिकतेचा कळस असून समाजमन संतप्त झाले आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी सर्व स्तरातून होत आहे. 

अद्याप आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही.

आरोपींचा शोधासाठी पोलिसांची तब्बल दहा पथके मैदानात उतरवली आहेत. सायबर सेल, फॉरेन्सिक पथक, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे गतिमान झाली आहे. घटनेचा तपास जलदगतीने सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दहा विशेष पथके तयार केली आहेत. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण, पीडितेकडून मिळालेली माहिती तसेच इतर सर्व बाजूंनी सखोल तपास करण्यात येत आहे. सायबर टीम व फॉरेन्सिक पथकाच्या मदतीनेही तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. मात्र, अद्याप आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही.

     मुलीची प्रकृती स्थिर

दरम्यान, वैद्यकीय अहवालानुसार पीडित मुलीला सुमारे ४ ते ५ टक्के भाजले आहे.. लोणी येथील रुग्णालयात तज्ज्ञ डॉ च्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

----- Advertisements -----

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी घटनेबाबत तसेच आरोपींबाबत कोणतीही माहिती असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

आमदार अमोल खताळांनी वेधले लक्ष 

ॲसिड हल्ल्याच्या घटनेने संताप व्यक्त होत असताना आरोपींना कठोर शिक्षा द्यावी व पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी आमदार अमोल खताळ पाटील यांनी केली. या घटनेचा मुद्दा त्यांनी सभागृहात उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले. यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तत्काळ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली. मनोधैर्य योजनेतून पीडितेला आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू असून तिच्या उपचारासाठी शासनाकडून आवश्यक व्यवस्था केली जात असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली.

काँग्रेसचा तळेगाव फाटा येथे रास्ता रोको

या अमानुष ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार दिनांक १८ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता तळेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आ. डॉ. सुधीर तांबे व डॉ. जयश्री थोरात हे सहभागी होणार आहेत.

शिकत रहा, कारण ज्ञान हेच आपले खरे सामर्थ्य आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin