ब्रेकिंग न्यूज :
भारत

जादा परताव्याच्या आमिषाला ६० ते ६५ गुंतवणूकदार फसले ; ६ कोटी ६५ लाखाला चुना

Blog Image
एकूण दृश्ये: 80

जादा परताव्याच्या आमिषाला ६० ते ६५ गुंतवणूकदार फसले ; ६ कोटी ६५ लाखाला चुना संगमनेरात शेअर मार्केटच्या नावाखाली ६ कोटी ६५ लाख ४० हजाराला गंडा ; आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा वर्ग 

      संगमनेर ( प्रतिनिधी )

अधिक परताव्याचे आमिष दाखवत बनावट गुंतवणूक कंपनी उभी करून तब्बल ६० ते ६५ जणांकडून तब्बल ६ कोटी ६५ लाख ४० हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेरात उघडकीस आला आहे. पैसे घेतल्यानंतर कार्यालय बंद करून आरोपी फरार झाल्याने एकवटलेल्या गुंतवणूकदारांनी संगमनेर शहर पोलिसांकडे धाव घेतली. 

या प्रकरणी राहुल शिंदे (आश्वी) महेश मोरे (माळेगाव पठा)र्), वैभव काकड ( घारगाव, डोळासने), विजय काळे ( मालदाड) यांच्या विरोधात शहर पोलीसात योगेश रामदास जराड ( आश्वी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ९ मार्च रोजी शहर पोलिसात भारतीय न्याय संहिता ३१८ (४) ३१६ (२) ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी 'अदमास डेप्ट कन्सल्टन्सी' प्रा. लि. आणि 'प्रथेमेश वेल्थ मॅनेजमेंट' या नावाने कंपनी सुरू करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा नफा देण्याचे आमिष दाखवले होते. सुरुवातीला काहींना परतावा देऊन विश्वास जिंकला. मात्र नंतर कार्यालय बंद करून आरोपी फरार झाले. पुढील तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक सचिन वाकडे करीत असून कंपनी तसेच गुन्हेगाराचा कसून शोध घेतला जात आहे. हा गुन्हाच अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली आहे.

----- Advertisements -----

स्वतःला ओळखणे हीच खरी प्रगतीची सुरुवात आहे.

महात्मा गांधी
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin