ब्रेकिंग न्यूज :
भारत

संगमनेरमध्ये १ लाखांची रोकड चोरी; निवृत्त शिक्षकाचे घर लक्ष्य

Blog Image
एकूण दृश्ये: 7

संगमनेरमध्ये १ लाखांची रोकड चोरी; निवृत्त शिक्षकाचे घर लक्ष्य

   संगमनेर (प्रतिनिधी)

शहरातील श्रमिक कृषी सेवा केंद्र परिसरात अज्ञात चोरट्यांनी निवृत्त शिक्षकाच्या घरावर डल्ला मारत तब्बल १ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची घटना १६ मार्च २०२६ रोजी सकाळी सकाळीच घडली. चंद्रभान विष्णू घुले (वय ६८, रा. शिवाजीनगर, संगमनेर) हे निवृत्त शिक्षक असून त्यांच्या घरातून सुमारे १ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

चोरट्यांनी घरात ठेवलेली रोख रक्कम तसेच एका बॅगेत ठेवलेले सोन्याचे दागिने, तसेच पतसंस्थेची कागदपत्रे व बँकेचे पासबुक असा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. हा प्रकार लक्षात येताच घुले यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जाधव तपास करीत आहे.

----- Advertisements -----

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin