ब्रेकिंग न्यूज :
भारत

'रंग बरसेच्या' रंगोत्सवात दिव्यांग विद्यार्थी न्हाहून निघाले ;

Blog Image
एकूण दृश्ये: 9

'रंग बरसेच्या' रंगोत्सवात दिव्यांग विद्यार्थी न्हाहून निघाले ; रोटरी क्लब, संग्राम निवासी मूकबधिर शाळेचा रंगोत्सव उत्साहात

    संगमनेर ( प्रतिनिधी )

जीवनात आनंदाचे, आशेचे आणि मैत्रीचे रंग भरले तरच आयुष्य खऱ्या अर्थाने रंगतदार बनते. हाच संदेश देणारा भावनिक आणि आनंददायी “रंग बरसे रंगोत्सव” संगमनेर येथील संग्राम निवासी मूकबधिर विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

रोटरी क्लब संगमनेर आणि दीपक इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांनी रंगांच्या उधळणीत अक्षरशः न्हाऊन निघत आयुष्यही अशाच रंगांनी भरून जावे, अशी आनंदाची अनुभूती घेतली.

रंग खेळत आनंद वाटण्याचा एक अनोखा आणि भावनिक क्षण यावेळी अनुभवायला मिळाला. रंगांच्या उधळणीत विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि एकमेकांवर उधळलेले रंग हे जणू जीवनातील आशा, प्रेम आणि मैत्रीचे प्रतीक ठरत होते. या आनंदोत्सवामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमा दरम्यान पवनकुमार वर्मा यांनी विद्यार्थ्यांना फळांचा मनसोक्त आस्वाद घेतला. तसेच रोटेरियन दीपकजी मणियार (दीपक इंडस्ट्रीज) यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले विविध रंगांचे अत्याधुनिक स्प्रे हे या रंगोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. या स्प्रेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी रंगोत्सव अधिक उत्साहात आणि आनंदात साजरा केला.

----- Advertisements -----

विद्यार्थ्यांसोबत शिक्षक आणि रोटरी क्लबचे सदस्यही या रंगोत्सवात सहभागी झाले. सर्वांनी मिळून रंगांची उधळण करत आनंदाचे आणि जिव्हाळ्याचे क्षण अनुभवले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, आनंद आणि समाजाशी असलेले आपलेपण अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी रोटरी क्लब संगमनेरचे अध्यक्ष विश्वनाथ मालाणी, सचिव सौरभ म्हाळस, प्रकल्प प्रमुख राजेंद्र खोसे तसेच क्लब संचालक पवनकुमार वर्मा, आनंद हासे, संदीप फटांगरे, भारतभूषण नावंदर, अमित पवार, अजित काकडे, मधुसूदन करवा आदी सदस्य उपस्थित होते.

दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत पुढील वर्षी हा रंगोत्सव आणखी मोठ्या आणि अधिक उत्साहपूर्ण स्वरूपात साजरा करण्याचा संकल्पही रोटरी क्लब सदस्यांनी यावेळी व्यक्त केला. या रंगोत्सवाने केवळ रंगांची उधळणच केली नाही, तर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंद, आत्मीयता आणि आशेचे अनेक रंग भरले.

निस्वार्थपणे काम केले, तरच जीवन यशस्वी होते.

संत तुकाराम
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin