ब्रेकिंग न्यूज :
भारत

बीजमातेच्या उपस्थितीत कर्तृत्ववान मातांचा सन्मान; संगमनेरात ‘स्त्रीशक्तीचा गौरव

Blog Image
एकूण दृश्ये: 99

बीजमातेच्या उपस्थितीत कर्तृत्ववान मातांचा सन्मान; संगमनेरात ‘स्त्रीशक्तीचा गौरव 

    संगमनेर ( प्रतिनिधी )

समाजाला संस्कार, संवेदना आणि सामर्थ्य देणाऱ्या स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी संगमनेरमध्ये एक प्रेरणादायी सोहळा रंगणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या., संगमनेर आणि साहित्य कुंज मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्त्रीशक्ती गौरव सन्मान २०२६’ या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा कर्तृत्ववान मातांचा सन्मान करण्यात येणार आहे.‌

समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान अमूल्य असून शिक्षण, सामाजिक कार्य, संस्कार आणि स्वावलंबनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या या मातांच्या कार्यगाथा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव करून समाजासमोर त्यांचे प्रेरणादायी योगदान मांडण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले. शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता कृष्णा गार्डन येथे हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी पद्मश्री बीजसंवर्धन जननी राहीबाई पोपेरे (बीजमाता) आणि समुपदेशक व सामाजिक कार्यकर्त्या ज्योती मालपाणी या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

संगमनेर शहर व परिसरातील नागरिक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणाऱ्या या प्रेरणादायी सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक प्रदीप शाह ,हर्षल गुंदेचा ललितांग शाह अरविंद गाडेकर बाळासाहेब पिंगळे आणि मनोज साकी यांनी केले आहे.

----- Advertisements -----

जीवनात यशस्वी होण्यासाठी धैर्य आवश्यक आहे.

सावरकर