ब्रेकिंग न्यूज :
भारत

आरोग्य चांगले राहण्यासाठी दातांची काळजी घ्या : डॉ घुले

Blog Image
एकूण दृश्ये: 24

आरोग्य चांगले राहण्यासाठी दातांची काळजी घ्या : डॉ घुले

 { महिला दिनानिमित्त नित्यसेवा क्लिनिकमध्ये निशूल्क दंत तपासणी शिबिर }

     संगमनेर ( प्रतिनिधी )

महिला आणि कुटुंबाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण दातांची काळजी घेतली पाहिजे दातांविषयी आपण जागरूक राहिलो पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर कुमुदिनी घुले यांनी केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत महिलांच्या मौखिक आरोग्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने संगमनेर येथील नित्यसेवा क्लिनिक येथे ६ ते ९ मार्च दरम्यान मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला शहरासह परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

चार दिवस चाललेल्या या शिबिरात अनेक महिलांनी आपल्या दातांची तपासणी करून घेतली. घर, कुटुंब आणि कामाच्या दैनंदिन जबाबदाऱीने महिलांकडून अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. विशेषतः दात व हिरड्यांच्या समस्या सुरुवातीला किरकोळ वाटत असल्या तरी त्याकडे वेळेअभावी दुर्लक्ष केले जाते. या पार्श्वभूमीवर महिलांना मौखिक आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी दंततज्ज्ञ डॉ. कुमुदिनी घुले यांनी महिलांना दात आणि हिरड्यांच्या आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दर सहा महिन्यांनी नियमित दंत तपासणी केल्यास दातांमधील कीड सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखता येते आणि साध्या उपचारांद्वारे दात सुरक्षित ठेवता येतात, असे त्यांनी सांगितले. मात्र वेळेवर उपचार न घेतल्यास पुढे रूट कॅनल किंवा दात काढण्याची वेळ येऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

----- Advertisements -----

आजच्या आधुनिक दंतचिकित्सेमध्ये रूट कॅनल, दंत प्रत्यारोपण डेंटल इम्प्लांट लेझर उपचार, स्केलिंग यांसारखे सुरक्षित व प्रभावी उपचार उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली. यासोबतच दिवसातून किमान दोन वेळा दात स्वच्छ करणे, योग्य पद्धतीने ब्रश करणे, गोड पदार्थांचे प्रमाण मर्यादित ठेवणे आणि नियमित दंत तपासणी करून घेणे या सवयी अंगीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले

.

स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तोच तुमच्या यशाचा पाया आहे.

अज्ञात
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin