संगमनेर ( प्रतिनिधी )
संगमनेर नगरपरिषदेच्या २१ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीने दणदणीत विजय मिळवत तब्बल २७ उमेदवारासह सौभाग्यवती आमदार यांनाही निवडून आणले. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने मिसेस आमदार म्हणून आणि आणि विशेष अशा ठरवलेल्या नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे ह्या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या. त्याचबरोबर दोन अपक्ष आणि एकनाथ शिंदे गटाच्या एक महिला उमेदवार असे एकूण ३० सदस्य आणि शहराचे प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्ष माहिती तांबे यांनी ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी नव्याने पदभार स्वीकारला.
दरम्यान मागील कालावधीत तब्बल चार वर्ष नगरपालिकेवर प्रशासकीय राज होता. प्रशासकीय कारभार म्हणजे नियोजनशून्य ढिसाळ कारभार आणि विकासकामे रखडल्याची तक्रार सातत्याने झाली. याच मुद्द्यावर संगमनेर सेवा समितीने प्रशासनावर जोरदार टीका करत आम्ही सत्तेत आलो की शहराचा कारभार सुरळीत चालवू आणि दर महिन्याला विकासकामांचा आढावा जनतेसमोर ठेवू असे भले हवेहवे असलेले मोठे गुलाबी आश्वासन दिले होते. परंतु सत्ता हातात येऊन अवघे दोन महिने उलटताच शहरात मोठे बदल झाल्याचे दावे समितीच्या वतीने करण्यात आले, बैठका घेत शहर विकासाचे कामाची छान स्वप्न दाखवणे सुरू झाले.

केवळ दोच महिन्यात विकासकामे ठप्प झाल्याचा ठपका पुन्हा प्रशासनावर ठेवण्यात आला. इतकेच नव्हे तर काही नगरसेवकांनी आंदोलनाचे हत्यार उचलत प्रशासन गेंड्याची कातडी असल्याचा आरोप करत पालिका प्रशासनाच्याच विरोधात मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या दालनात ठिय्या देत घोषणाबाजी केली. त्यामुळे स्वतःकडे सत्ता असताना नगरसेवकांनी केलेला आंदोलनाचा हा प्रकार म्हणजे केवळ स्टंटबाजी, दिखावा असल्याचा सवाल आता शहरात जोर धरू लागला आहे.

आता सत्तेवर असलेलीच मंडळी प्रशासना विरोधात आंदोलन करताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शहर विकासासाठी ठोस निर्णय घेण्याऐवजी आंदोलनाचा मार्ग निवडणे हे केवळ राजकीय नौटंकी असल्याची चर्चा शहरात रंगू्तांना दिसून येत आहे. नगरविकासाची कामे ही केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून तसेच नागरिकांनी भरलेल्या करातून केली जातात. अशा परिस्थितीत प्रशासन काम करू देत नाही हा आरोप कितपत खरा ? कारण या प्रभागातील जनतेने आपणास निवडून दिलेले आहे या प्रभागाचे कामे करणे म्हणून आपण या नगराचे सेवक असताना कामे करून घेणे आपले प्रथम कर्तव्य आहे. असा प्रश्नही उपस्थित होत आहे.


एकीकडे शहर विकासासाठी वेगळी भूमिका मांडणारे आमदार सत्यजीत तांबे यांची भूमिका आणि दुसरीकडे त्याच समितीतील नगरसेवकांचे मनसुबे आंदोलन या विरोधाभासामुळे तापलेल्या वातावरणातही आता हास्यास्पद वारे प्रभागात वाहू लागले असून संख्याबळ निकामी ठरत असल्याच्या चर्चेला उधाण आले. सत्ता, जबाबदारी आणि आंदोलन या तिन्हींच्या कोंडीत मात्र शहराचा विकास आणि समस्या अडकलेल्या दिसू लागल्याने संगमनेर नगरपालिकेकडे सेवा समितीच्या कार्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
जीवनात यशस्वी होण्यासाठी धैर्य आवश्यक आहे.
सावरकर