एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकू हल्ला; हल्लेखोराने घेतली शेततळ्यात उडी ; दोघे बचावले, उपचार सुरू, गुन्हा दाखल
संगमनेर ( प्रतिनिधी )
तालुक्यातील रणखांब परिसरात एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. १६ दुपारी ३ च्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. तर हल्ल्यानंतर सदर युवकाने स्वतःवरही वार करून शेततळ्यात उडी मारत जीव देण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. चाकूने केलेल्य वाराने दोघेही गंभीर जखमी झाले असून दोघांवर उपचार सुरू आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी आहे की, रणखांब येथील २१ वर्षीय तरुणीवर पिंपरणे येथील जर्नादन गोरक्षनाथ साळवे (वय २५) याचे एका तरुणीबद्दल एकतर्फी प्रेम होते. त्याने तरुणीला भेटून लग्नाची इच्छा व्यक्त केली. मात्र तरुणीने नकार दिल्याने संतप्त झालेल्या जनार्दन साळवे याने रणखांब येथे जावून घरातच तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. . हल्ल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला स्वतःवरही वार करून घेतले आणि जवळील शेततळ्यात उडी मारत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थ एकत्र येत पोलीस सुरेश टकले, अजय कौटे, आदिनाथ गांधले काही नागरिकांनी तरुणाला शेततळ्यातून बाहेर काढले.
संगमनेर येथील एका खासगी रुग्णालय त्याच्यावरही उपचार सुरू करण्यात आले. घटनेबाबत परिसरात संतापाची लाट उसळली असून घारगाव पोलिसात भारतीय न्याय संहिता 109 333 4 /25 सह 1951 चे कलम 37 ( 1 ) (3) प्रमाणे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे घारगावचे पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी भेट दिली घटनेचा तपास ए. व्ही. खाडे करीत आहेत.

