*संगमनेर मध्ये पूर्वी पुरूषच ओढत होते हनुमानाचा रथ ; 96 वर्षां पासून महिला ओढतात रथ ; 120 वर्षां पासून सुरू आहे विजय रथोत्सवाची परंपरा ; रथोत्सवाला करावा लागला विविध अडचणींचा सामना; रथासह उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी शहरवासीयां समोर आहे मोठे आव्हान**
*संगमनेर भारत रेघाटे*
1) महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर शहराचा धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा फार जुना आहे. आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत अडकला होता, तेव्हा युवा वर्गापासून ते वृद्धांपर्यंत आणि महिलांनीही या देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. यातील काही आठवणी इतिहासाच्या पानात कोरल्या गेल्या, तर काही काळाच्या ओघात नष्ट झाल्या तर काही गौरवशालीही झाल्यात.
2) पुण्यात महात्मा जोतिबा फुले, बाळ गंगाधर टिळकांनी ज्या प्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा आरंभ केला. समाजातील लोकांना इंग्रजांविरुद्ध संघटित करण्यासाठी या परंपरेचा जागर तेवत ठेवला. तसाच जागर संगमनेर मध्येही काही लोकांनी महाबली हनुमान जयंतीला रथोत्सवातून स्वातंत्रेसह धार्मिक परंपरेचा पाया घातला. परंतु स्वातंत्र्याचा हा पाया खिळखिळा करण्याचे काम इंग्रज सरकारने केले.
3) संगमनेरचा रथोत्सव हा इंग्रजांच्या जुलमी सत्तेच्या विरोधातील बुलंद आवाज होता. या रथोत्सवास अनेकदा खंडित करण्याचा प्रयत्नही केला गेला, मात्र संगमनेरच्या काही रणरागिणी महिलांनी इंग्रज अधिकार्यांना कडाडून विरोध करून या रथोत्सवाची कमान स्वत:च्या हातात घेतली ती भू- मातेच्या स्वाभिमाना साठीच. अन सुरू झाली विजय रथोत्सवाची परंपरा. आजही ती तेवढ्याच ताकदीने सुरू आहे. आणि राहणार आहे यात शंका नाही.
4) संगमनेर शहरात खळखळ वाहणा-या प्रवरा, म्हाळुंगी, नाटकी, म्हानुटी, आढळा या नद्या वाहत होत्या. अमृतवाहिणी प्रवरा संगमावर दिमाखात वसलेले अनेक मंदिरे आहेत. जणूकाही एक प्रकारे 'मंदिरांचे गाव' म्हणूनच अशी ख्याती या गावास आहे. चंद्रशेखर चौकातील प्रसिद्ध श्रीराम, हनुमान मंदिर आजही लोकांच्या आत्मिक, धार्मिक श्रद्धेचे केंद्र बनलेले आहे. गावातील लोक कोणताही शुभारंभ करण्यापूर्वी येथील पूज्य ग्राम देवतेचा आशीर्वाद हमखास घेतात.
5) ब्रिटिश राजवटीचा काळ फार बिकट होता. इंग्रजांच्या विरोधात जनतेला एकत्र करण्यासाठी महात्मा जोतिबा फुले, बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केली. याच प्रेरणेने चंद्रशेखर चौक, वाडेकर गल्ली, ब्राह्मण गल्ली, खंडोबा गल्ली, सुतार गल्ली, रंगार गल्ली आदि भागातील काही तरुणांनी एकजुटीने श्री हनुमान जयंती निमित्त शहरात रथाची मिरवणूक काढण्यास सुरुवात केली. याच मिरवणुकीत संपूर्ण संगमनेरकर जय श्रीराम, बजरंग बली की जय या घोषणा देत संपूर्ण परिसर दुमदुमून टाकत असत. समर्थ रामदास स्वामींना मारुती बलोपासनेचे महत्त्व माहीत होते. त्याचा परिपाक म्हणून संगमनेर मध्येही हनुमान जयंतीला निघालेल्या या रथोत्सवाच्या मिरवणुकीने लोकांमध्ये नवी ऊर्जा संचारली आणि लोक आपापल्या परीने दरवर्षी या उत्सवात गावकी भावकी न आणता, राजकारण विरहीत आपापले योगदान देऊ लागले.
6) 1905 मध्ये 20 फुटी मनोरथ पूर्ण करणारा रथ तयार झाला ; अन प्रथमच श्री हनुमान याच रथात आरूढ झाले*_ 1901 ते 1905 या काळात नामदेव आणि सुंदर खरे या सुतार बांधवांनी हा रथ तयार केला. संगमनेर शहरातील शिल्पकार नामदेव खरे आणि त्यांचे बंधू सुंदर खरे (मिस्त्री) या बंधूव्दयांनी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीसाठी विनामूल्य रथ देण्याचा प्रस्ताव ग्राम उत्सव समिती समोर ठेवला, गाव उत्सव समितीने तो प्रस्ताव आनंदाने स्वीकारला. 1901 ते 1905 मध्ये खरे बंधूंनी मलबार सागवान लाकडापासून 20 फूट अर्थात एक ते दीड मजली उंच रथ बनविण्यास सुरुवात केली. तो 1905 मध्ये पूर्ण बनवून तयार झाला. या रथावर एकीकडे शौर्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराज , तर दुसरीकडे महात्मा गांधीं यांचा शांतीचा संदेश देणारी नक्शीकाम केलेल्या तीन फूट कोरीव मूर्ती आहेत. या सोबतच खरे बंधूंनी हनुमानजींची तीन फुटांची भक्त स्वरूपमूर्ती तयार केली. या रथाला चार चाके आहेत. मागची दोन चाके मोठी आणि पुढची दोन लहान चाके आहेत. या रथाला बेअरिंग जॉग देखील बसविण्यात आला आहे. जेणेकरून रथ रस्त्यांच्या वळणावर सहज वळू शकेल. तसेच,चाकांमध्ये बेअरिंग्ज बसवण्यात आल्या आहेत. जेणेकरून रथ ओढणाऱ्यांना जास्त ताकद लावावी लागणार नाही. आजमितीस या रथाला 120 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1905 मध्ये प्रथमच श्री हनुमान याच रथात आरूढ झाले आणि रथोत्सवास सुरूवात झाली.
ताक :-