भारत

"राजगृह न्यूज" च्या वृत्ताची घेतली दखल; नगर पालिका एक्शन मोड वर;

Blog Image
एकूण दृश्ये: 76

"राजगृह न्यूज" च्या वृत्ताची घेतली दखल; नगर पालिका एक्शन मोड वर; नागरिकांनी मानले आभार

   संगमनेर

शहरात जागोजाग कचरा साठल्या बाबत राजगृह न्यूज ने याबाबत प्रथम आवाज उठून जनमाणसात जागृती आणण्याचे काम केले. सदर वृत्ताची दखल घेण्यासाठी अखेर पालिकेला जागे व्हावेच लागले. आणि अखेर पालिकेने सदर घटनेची तात्काळ दखल घेत शहरातील अनेक ठिकाणी तसेच रस्त्यावर ओपन स्पेस मध्ये पडलेला कचरा स्वच्छ करण्याचे काम आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. याबाबत नागरिकांनी राजगृह चे आभार मानले.

फोटोच्या माध्यमातून डॉ शिवाजी कर्पे यांनी "सकाळचा फेरफटका" या नावाखाली सुगंध कॉलनीतील दुर्गंध आणि संगमनेर नगरपरिषदेच्या गलथान कारभारा बाबत छायाचित्र सोशल केल्याने या वृत्तास "राजगृह" न्यूज ने तात्काळ वाचा फोडल्याने नगर पालिकेने तात्काळ दखल घेत सुगंधी कॉलनी सह शहर परिसरातील अनेक जागेत पडलेल्या कचरा याबाबत पालिकाच आता चांगलीच ॲक्शन मोडवर आली असून सुलभ सौचालया बरोबर रस्त्यावरीलही घाण साफ करण्यासाठी पालिकेने लगेच तत्परता दाखवली. ताबडतोब एक्शन घेत तो परिसरही स्वच्छ केल्याबद्दल मुख्य मुख्याधिकारी रामदास कोकरे नगर पालिकेच्या आरोग्य विभागाचे ही धन्यवाद व्यक्त करत आभार मानले।

 

----- Advertisements -----

सुखाचे रहस्य समाधानात आहे.

संत ज्ञानेश्वर
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin