26 ला संगमनेरमध्ये जिहादी हल्ल्याच्या निषेधार्थ भव्य तिरंगा मार्च
संगमनेर
कश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर जिहादी आतंकवाद्यांनी अत्यंत क्रूर आणि अमानवी पद्धतीने हल्ला करून त्यांची धर्म विचारून, कलमा वाचायला लावले आणि कपडे काढून विटंबना केली, अमानुषतेचा कळस गाठला. या अत्यंत संतापजनक घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी संगमनेर शहरात भव्य तिरंगा मार्च काढण्यात येणार आहे.
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल हिंदू समाज तसेच संगमनेरमधील सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात येत आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्याबरोबरच, देशविघातक प्रवृत्तींना जशास तसे उत्तर द्यावे, अशी जोरदार मागणी या मोर्चामधून करण्यात येणार आहे. शनिवार, दि. २६ एप्रिल ला सायं. ४:३० वा. हा मार्च स्वातंत्र्य चौक , अशोक चौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बस स्टँड नवीन नगर रोड, प्रांत कार्यालय असा निघणार आहे. तमाम नागरिकांनी या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.