भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्श सोहळ्याचे आयोजन ; देशमुख कुटुंबातील सुहासिनी करणार आंबेडकरांचे औक्षण ; घटनेला होतात 84 वर्ष ;कोतुळात एकत्र जमणार बहुजनांचा महासागर
संगमनेर { प्रतिनिधी }
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला रविवारी 27 एप्रिलला या घटनेला 84 वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने केवळ भीम सैनिकच नाही तर समस्त बहुजन समाज कोतुळात एकवटणार असून संगमनेर अकोले पंचक्रोशीतील जनसागर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे.
चला तर मग आपणही कोतुळ या गावी 84 वर्षापूर्वी झालेल्या घटनेचे आणि सुवर्णक्षणाचे साक्षीदार होऊ या ! या सोहळ्याला बाबासाहेबांचे नातू श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांची परिषद घेऊन एक इतिहास रचला. अकोले तालुक्यातील कोतुळ या छोट्याश: गावात त्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 84 वर्षांपूर्वी महिलांची परिषद घेऊन या ठिकाणी जनजागृती करण्याचे महान कार्य त्या काळी केले. आणि तो क्षण ठरला ऐतिहासिक. अकोले तालुक्यातील कोतूळ गावामध्ये त्यांचे सर्व समाजांनी एकत्र येत भव्य स्वागत केले होते. या इतिहासाच्या सुवर्णपानाला उजाळा देण्यासाठी येत्या 27 एप्रिलला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी सोहळा पार पडत आहे.
_उत्कर्षा रूपवते यांनी केले आवाहन_
महाराष्ट्र एकसंध आहे हे दाखवून देणाऱ्या या सोहळ्याला आपण सर्वांनी हजारोंच्या संख्येने या ऐतिहासिक कार्यक्रमास आपण उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन ि वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी केले.
_*देशमुख कुटुंबातील सुहासिनी करणार आंबेडकरांचे औक्षण*_
कोतूळ येथील या घटने बद्दल रवींद्र देशमुख म्हणाले की, स्व. भाऊदाजी देशमुख हे तत्कालीन जिल्हा बोर्डाचे लोकल सदस्य होते. त्याकाळी अस्पृश्यतेचा जोर असताना त्यास जुगारून माझे पणजोबा भाऊदाजी देशमुख यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आमंत्रित केले होते. घरी आगमन होताच त्यांना चोपाळ्यावर बसून भाऊदाजी देशमुख यांची नात इंदिरा यांनी महामानवाचे औक्षण केले. उत्तमराव पतिंगराव देशमुख पाटील यांच्या सोबत विवाह झाला त्या चाळीसगावहून आल्या की, असून मधून सदर घटनाक्रमाची इत्यंभूत माहिती त्या सांगत असत. स्व. भाऊदाजी नंतर नानासाहेब ,बाळासाहेब, आणि रवींद्र देशमुख अशी चौथी पिढी आजही या पदस्पर्शाचा ऐतिहासिक सोहळा साजरा करतात . 27 तारखेला श्रध्येय डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांचेही स्वागत याच चोपाळ्यावर बसून देशमुख कुटुंबातील सुहासिनीच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.