भारत

कोकणगावात ट्रॅव्हल ट्रकचा भीषण अपघात;

Blog Image
एकूण दृश्ये: 1865

कोकणगावात ट्रॅव्हल  ट्रकचा भीषण अपघात; ३ जण जागीच ठार, दोन्ही वाहनाचे चालक वाचले ८ गंभीर ,वाहनसह मालाचे प्रचंड नुकसान 

     संगमनेर  प्रतिनिधी 

कोकणगाव परिसरात कोल्हार घोटी महामार्गावर ट्रॅव्हल आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला. या भीषण दुर्चटनेत तिघे जण जागीच ठार झाले असुन आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.  

घटना रविवार दि. १५ जुन रोजी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात प्रवीण सोपान कांदळकर, (वय 28, सुकेवाडी, ता. संगमनेर), फिरोज लाला शेख (वय 46, कसारादुमाला, ता. संगमनेर), अंजु प्रवीण वाल्मिकी (वय 39, हरियाणा) असे तिघे जण मयत झाले आहे. तर हर्षिता सोनू वाल्मिकी, बिराला पूनम, सोनिया रमेश बिर्ला, रिया अजय चावरीया, ऐश्वर्या चंद्रशेखर पाटील, लता सुरेश, चक्रनारायण (सर्व मुंबई), प्रथमेश राजेंद्र कोल्हे, पोहेगाव, ता. कोपरगाव मोहमद रफीक जलील शेख नाईकवाडपुरा, ता. संगमनेर) हे गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

        याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील कोल्हार घोटी महामार्गावरून ट्रॅव्हल एम. एच.46 सी. यु. 2754 प्रवाशांना घेऊन शिर्डी, शनिशिंगणापूर देवस्थानकडे जात असते. आज देखील गाडी संगमनेर वरून प्रवाशांना घेऊन सकाळी शिर्डीकडे जात होती. मोठ्या संख्येने यामध्ये प्रवाशी बसलेले होते. बहुतांश प्रवाशी हे देव दर्शनासाठी बाहेर गावांमधुन आले होते. सकाळी कोकणगाव मध्ये लोणीच्या दिशेने समोरून एम. एच.12 एन. एक्स. 1454 हा ट्रक आला. सदर ट्रक आंब्याने भरलेला होता त्यामुळे, गाडीत खूप लोड होता. ट्रक व ट्रॅव्हलचालक यांना वेगावर नियंत्रण करता आले नाही. त्यामुळे, दोन्ही गाड्या समोरा समोर एकमेकांना धडकल्याने रस्त्याच्या खाली फेकल्या गेल्या.

----- Advertisements -----

          ट्रॅव्हलमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशी असल्याने तिघे जण मयत झाले तर आठ गंभीर जखमी झाले आहे. ट्रकचा सहाय्यक जागीच ठार झाला. दोन्ही गाड्यांचे चालक हे सुखरूप असले तरी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रकमध्ये प्रवाशी नसल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही परंतु आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

 

           भरधाव वेगाने दोन्ही गाड्या असल्याने मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी आले. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस एस एस सातपुते, आर ए लांंघे ,एस के उगले घटनास्थळी दाखल झाले असून एस एस सातपुते पुढील तपास करीत आहेत .

----- Advertisements -----

स्वत:ची किंमत ओळखली, तर जग जिंकल्यासारखे आहे.

संत एकनाथ
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin