भारत

तक्रारदारच निघाला खंडणीखोर ; पिता पुत्रांवर गुन्हा दाखल;

Blog Image
एकूण दृश्ये: 361

तक्रारदारच निघाला खंडणीखोर ; पिता पुत्रांवर गुन्हा दाखल; अखेर पुरवठादारावर केलेले आरोप फोल ; पोलखोलने ब्लॅकमेलरचे पितळ उघड ; अनेकांनी घेतला धसका 

      नाशिक ( प्रतिनिधी )

औषध पुरवठादाराकडे ५० हजाराची खंडणी मागून पुन्हा १५ लाख रुपयाची खंडणी मागितल्याचा प्रकार नाशिकात समोर आल्याने एकच खळबळ उडाली असून खंडणीखोर पिता पुत्रावर गुन्हा दाखल झाल्याने अनेकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. 

     याबाबत पोलीस सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार टेंडरची माहिती मिळवत दोन भामट्यांनी ५० हजारांची खंडणी उकळून पुन्हा लाखो रूपयांचा तगादा लावल्याने हा प्रकार पोलिसात पोहोचला. या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते असलेले जैन पिता पुत्रा विरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

         गेल्या काही दिवसा पासून एका दैनिकात आणि चॅनेलने एकतर्फी वृत्तांकनातून जिल्हा शल्य चिकित्सक नाशिक आणि जिल्हा रुग्णालयाशी संबंधित पुरवठादार गेटवेल डिस्ट्रिब्युटर यांच्या बाबत खोटे नाटे, तथ्यहीन वृत्तमालिकाच सुरू ठेवली होती. परंतु या प्रकरणात केलेले सगळे आरोप हे खंडणी उकळण्याच्या हेतूने केले गेल्याचे उघडकीस आल्याने कंत्राटदारावर केलेले आरोप फोल ठरले. एवढेच नव्हे तर पोलखोल करताच तक्रारदारच खंडणीखोर निघाल्याचे अखेर निष्पन्न झाले. तर या प्रकरणामुळे ब्लॅकमेल करणाऱ्याचेही पितळ उघड पडले असून खंडणीखोर पिता पुखराज माणिकचंद जैन आणि पुत्र नीलराज पुखराज जैन यांचा समावेश आहे.      

        माहितीनुसार, कपिल रमेश अरोरा गणेश बाबानगर, नाशिक यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार जैन पिता पुत्र विरोधात भारतीय न्याय संहिता ३०८(२) ३०८(३) ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याने अनेकांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसून येत आहे.

----- Advertisements -----

              अरोरा यांचा शासकीय रुग्णालयांना औषध पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातही ते औषध पुरवठा करतात. गेल्या जानेवारी ते १२ जून दरम्यान संशयितांनी माहितीच्या अधिकारात जिल्हा रुग्णालयाच्या टेंडरबाबत माहिती मिळवत अरोरा यांना 'ब्लॅकमेल' केले. जैन पिता पुत्राने बदनामी करण्याची धमकी देत ५० हजार रूपये उकळले त्यानंतरही १५ लाख रूपयाच्या खंडणीसाठी तगादा लावला. एवढेच नव्हे तर प्रसारमाध्यमांत खोट्या बातम्या प्रसारित करून अरोरा यांना वेठीस धरले. औषध पुरवठादार यांची वैयक्तिक बदनामी करणे, खंडणी मागणे, ब्लॅकमेल करणे या आरोपा खाली तक्रारदार पुखराज जैन मुलगा नीलराज जैन वर गुन्हा दाखल करण्यात आला असून ते दोघेही फरार आहेत.

एकतर्फी वृत्तमालिका प्रसिद्ध करणाऱ्या मागे खरे सूत्रधार कोण आहेत ?.असे नानाविध प्रश्न या निमित्ताने जनतेत चर्चेचा विषय ठरत आहेत. या षडयंत्रा मागे मुख्य सूत्रधार शोधण्याचे खरे आवाहन मुंबई नाका पोलिसा समोर उभे ठाकले असून पोलीस प्रशासन या घटनेतील अन्य व्यक्तीवर कोणती कार्यवाही करेल याकडे आता सर्वाचेच लक्ष लागले आहे.

परिस्थिती हीच आपल्या आयुष्याची खरी परीक्षा असते.

संत तुकाराम
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin