भारत

आमदार साहेब आपण पुढे आलाच नाही जरा थोडं पुढं यायच ना !

Blog Image
एकूण दृश्ये: 1055

आमदार साहेब आपण पुढे आलाच नाही ; जरा थोडंस पुढं यायच ना ! पोकळ वासे ऐकले ,जरा पोकळ ड्रेनेजही बघा, पालिकेने केलेला रस्त्याचा अजब कारभारही बघा

     संगमनेर { प्रतिनिधी }

तब्बल सात फुट खोल रस्त्याखाली गटारीवर पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन गेली आहे. नगरपालिकेच्या वतीने काम करताना पाईपही फुटल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले. उद्घाटनाच्या काही दिवसां पूर्वी पाईप लाईनचे कामे करण्या करिता खड्डा बुजविण्या ऐवजी पालिकेने सदरची कामे तशीच ठेवले आहे. पुलाचे उद्घाटन झाले खरे ! आजपासून १६ जूनला शाळा सुरू झाली असून विद्यार्थ्यांसह भक्त, ज्येष्ठ नागरिक, महिलांना याच रस्त्यावर पुन्हा अडचणींचा सामना करण्याची वेळ आली असून जणू काही आगीतून निघालो अन् फुफाट्यात पडलो की काय ? अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त करतांना दिसून येतात.

     पालिकेचा अजब कारभार बघण्यासाठी आमदार साहेब आपण पुढे आलाच नाही ; जरा थोडं पुढं यायच होतं ना ! आपण पुलाचे शानदार उद्घाटन केले. परंतु पुलाच्या खाली थोडं वाकून आणि थोडंस पुढे मंदिराकडे गेला असता तर मंदिर दर्शना बरोबर रस्त्याची अवस्था काय झाली ? आणि पालिकेच्या कामाचे प्रदर्शनही बघायला मिळाले असते. बरं का ! पालिकेने काम ठेवले पसरत ; नागरिक करतात तारेवरची कसरत. असे शब्द आता कानी पडायला लागलेत. सदर काम लवकर करावे अशी मागणी मंदिर विश्वस्त सुरेश मयूर, साई भक्त आणि परिसरातील नागरिक करीत आहेत. एवढेच नव्हे तर आपण सर्वांनी पोकळ वासे नेहमीच ऐकले, पालिकेने ठेवलेले पोकळ ड्रेनेजही जरा बघा असा सूर या परिसरातून उमटत आहे.  

----- Advertisements -----

        साई मंदिर व्यवस्थापक मंडळाच्या वतीने सुरेश मयूर यांनी नगरपालिकेकडे मागणी केली की, दि. 3 जुलै रोजी गुरुवार पासून साई मंदिरात "गुरुपौर्णिमा" उत्सवाला सुरुवात होत आहे. मंदिरात येणाऱ्या भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. सुदैवाने पूल झाला. पऱंतु नगरपालिकेने मंदिरापासून पुलापर्यंत पाईप लाईन आणि गटारीसाठी खोदकाम करून ठेवलेले असून ते तसेच अर्धवट करून निघून गेले. खड्डे, माती, चिखल, पाणी यामुळे राडा रोढा झाला. ये जा करण्या-यास चांगलीच कसरत करावी लागते. रस्त्यावरून दुचाकी, सायकलस्वार, पादचारी, नीट जाऊ शकत नसल्याने ते पालिकेला निवेदनातून हाक देतात. गुरुपौर्णिमा उत्सव सुरू होण्यापूर्वीच सदर कामे पूर्ण करावीत अशी मागणी ते करतात.

     *नगर पालिकेने अमृतवाहिणीत सोडली गटार* 

    पंपिंग स्टेशन, घोडेकर मळ्याची पाईपलाईन आणि गटारीचे पाणी हे नदीपात्रात पाईप टाकून सोडण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केला गेला. परंतु पालिकेला नेमकी कामाची लाईनच माहीत नसल्याने पाईप लाईनचे काम पूर्णतः बिघडल्याचे दिसून येत आहे. सदर पाणी खुर्द च्या विहिरीत उतरत असल्याने नदी पात्रातील दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिकाचे आरोग्य धोक्यात आल्याने खुर्द येथील नागरिकांनी विरोध दर्शवत आंदोलन केलीत. नगर पालिकेने पाच वर्षापूर्वी टाकलेल्या गदार लाईनचे खोदकाम सुरू केले, पण त्या गटार लाईनच्या वर पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन गेल्याने, काही केल्या पालिकेला कामाची लाईन लागेना. आता पावसाळ्याचे दिवस. बळीराजाची धावपळ आणि शालेय विद्यार्थ्यांना रोज ये जा करण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करावी लागणार हे तितकेच खरे. सदरची समस्या पालिकेने तात्काळ सोड्वाव्यात असा सूर उमटत आहे.

समजूतदारपणा ही जीवनाची खरी शिकवण आहे.

संत तुकाराम