ग्रामीण भागातील विद्यार्थी श्रमदानातून हवे ते शक्य करतात - पंडित पळसुले
[पुणे येथे दिमागदार सोहळा ]
संगमनेर प्रतिनिधी
प्रगत तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस मोठा बदल झाला असून दुसरीकडे शिक्षण पद्धतीत विरोधाभास आजही जाणवतो. शहरी आणि ग्रामीण भागात ही दरी वाढल्याचे प्रखरतेने जाणवते. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी आज कोणत्याच क्षेत्रात कमी नाही. काही गोष्टीचा अभाव असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी श्रमदानातून हवे ते शक्य करून दाखवतात असे प्रतिपादन सुप्रसिद्ध तबला वादक पंडित रामदास पळसुले यांनी केले.
सायखिंडी येथील श्री मनोहरदासबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री मनोहर बाबा विद्यालय सायखिंडी शाळेने श्रमदानातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला स्वच्छ शाळा सुंदर शाळा हे ब्रीद घेऊन श्रमदान करणारी शाळा म्हणून लौकिक मिळवला. रामदास पळसुले यांच्या हस्ते शाळेचा गौरव करण्यात आला . त्यावेळी पळसुले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शैक्षणिक अभ्यासक्रमात संगीत, गायन , वादन, नृत्य तसेच शारीरिक शिक्षण या विषयासाठी स्वतंत्र, अनुभवी, तज्ज्ञ, शिक्षक असावेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसह अन्य प्रगती महत्व ची आहे त्याच बरोबर आणि चांगले संस्कार मिळावेत असे ते म्हणाले.
सदलरा ज्यस्तरीय स्पर्धा मातृ मंदिर विश्वस्त संस्था पुणे यांच्या वतीने घेण्यात आली होती राज्यातून अनेक शाळेने सहभाग घेतला होता त्यामध्ये संगमनेर सायखिंडी येथील मनोहर बाबा या शाळेने यश मिळविले.
या कार्यक्रमास श्री. मनोहरदास बाबा शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी अँड गणपतराव गांडोळे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश बो-हाडे, संस्थेचे संचालक संजय खतोडे, मुख्याध्यापक संदीप सातपुते, उपक्रम प्रमुख रवींद्र वर्पे आदी उपस्थित होते.
शाळेची विद्यार्थिनी कुमारी स्नेहा गोरे हिने वक्तृत्व स्पर्धेत नवी दिल्ली येथे देशात प्रथम क्रमांक मिळविला. शासकीय चित्रकला परीक्षेचा या वर्षीचा शंभर टक्के निकाल लागला आहे. दरवर्षी दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागत असतो. शाळेत सायकल बँक , उपक्रम, योगासने , प्राणायाम, सूर्न्य नमस्कार उपक्रम, अधिकारी विद्यार्थी भेटीला एक विद्यार्थी एक वृक्ष उपक्रम, असे अनेक शालेय उपक्रम मुख्याध्यापक संदीप सातपुते यांच्या मार्गदर्शना खाली शाळेत राबविले जात आहेत.
शाळेला ग्राम पंचायत तसेच स्थानिक संस्था, पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकारी, पालक व ग्रामस्थ यांचे बहुमोल योगदान लाभत असते. शाळेला राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सायखिंडी परिसरातून शाळेचे कौतुक होत आहे.