विश्वकर्मा तांबट समाजाचा राज्यस्तरीय मेळावा ; उपनयन संस्कार, वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन ;
ठाणे, पुणे, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, नाशिक जिल्ह्यातील बटुंचा उपनयन संस्कार
संगमनेर [ प्रतिनिधी ]
"विश्व ब्राह्मण" म्हणून ख्याती असलेल्या 'विश्वकर्मा त्वष्टा पांचाळ' समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक विश्वकर्मा पांचाळ तांबट समाज संगमनेर यांनी दिली.
संगमनेर येथील साई मंदिरा जवळ असलेल्या सर्वोदय चॅरिटेबल ट्रस्टचे नवीनभाई शहा मंगल कार्यालयात हा सोहळा संपन्न होणार आहे.
धर्म संस्कार आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या या खास कार्यक्रमा मध्ये विशेष धार्मिक कार्यक्रम, समन्वय समाजाचे, स्नेहबंध, ऋणानुबंध आणि विश्वासाच्या सप्तपदीसाठी वधू - वर परिचयाही प्रबंध करण्यात आला आहे. त्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील अहिल्यानगर ,पुणे, नाशिक, जळगाव, ठाणे, सोलापूर या जिल्ह्यातील तब्बल 41 बटुंचा उपनयन संस्कार पार पडणार आहे.
*यांची राहणार खास उपस्थिती* तांबट समाजाच्या होत असलेल्या या राज्यस्तरीय मेळाव्याच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती मध्ये परम पूज्य ह.भ.प. श्री भास्कर गिरीजी महाराज (महंत श्रीक्षेत्र देवगड नेवासा ) राधाकृष्ण विखे पाटील ( पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ) अमोल खताळ आमदार (संगमनेर ) संग्राम भैया जगताप आमदार (अहिल्यानगर) सत्यजित तांबे आमदार ( पदवीधर मतदार संघ नाशिक) उद्योजक गिरीश मालपाणी , डॉ. जयश्री थोरात ( अध्यक्षा तालुका युवक काँग्रेस ) तसेच विश्वकर्मा पतसंस्थेचे देविदास गोरे, विश्वकर्मा पांचाळ समाज पुणे विष्णू जगन्नाथ गोमासे, पुरोहित संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी, विश्वकर्मा तांबट समाज नाशिक, बाळासाहेब विष्णू नगरकर, विश्वकर्मा त्वष्टा पांचाळ समाज अहिल्यानगरचे सुनील वामनराव नाळके आदि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
राज्यस्तरीय मेळाव्यात मंगळवार दि. 13 मे 2025 रोजी सायंकाळी 8 वाजता वधू वर परिचय मेळावा होणार असून दुस-या दिवशी बुधवार दि. 14 मे 2025 सकाळी 6 ते दुपारी 12 वाजे पर्यंत मौजबंधन सोहळा होणार आहे. दुपारी 2 वाजता अलौकिक असा राज्यस्तरीय समाज मेळावा होणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वकर्मा पांचाळ तांबट समाज संगमनेर कार्यकारिणी परिश्रम घेत आहेत.
सदर दोन दिवसीय राज्यस्तरीय मेळाव्यात उपनयन संस्कार अर्थात मौंजबंधन, तद्वतच दिमाखदार वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले असून हा मेळावा मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे.
*अतिथी गणांचा होणार सन्मान सोहळा*_ विश्वकर्मा पांचाळ तांबट समाजातील आपल्या कार्याचा आलेख सतत उंचावत ठेवणाऱ्या समाज बांधवांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या पुरस्कारा मध्ये
▪️श्री वि्शकर्मा पांचाळ तांबट रत्न, ▪️समाजदीप गौरव पुरस्कार, ▪️समाज भूषण गौरव पुरस्कार, ▪️त्वष्टा उत्कर्ष गौरव पुरस्काराने अतिथींना गौरविण्यात येणार आहे.
श्री विश्वकर्मा पांचाळ तांबट समाज संगमनेर यांचे सह महाराष्ट्रातील तमाम विश्वकर्मा तांबट समाज यांचे बहुमूल्य योगदान लाभणार आहे.
*चलो संगमनेर असे म्हणत संगमनेरकरांनी दिली हाक*
-गेली अनेक महिन्यापासून प्रयत्नाची पराकाष्टा करत समाजामध्ये समन्वय, वधू वर मेळावा, मौंज बंधनासह समाज बांधवाचा सन्मान करण्यासाठी संगमनेर येथील समाज बांधवांनी सुनियोजित अशा या सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, नाट्यछटेतून आणि जनसंपर्काच्या माध्यमातून या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली "चलो संगमनेर" असे म्हणत हाक दिली. त्यास महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांनी भरभरून प्रतिसादही दिला .संगमनेरकरांनी दिलेल्या या हाकेतूनच ही वज्रमूठ पक्की बांधत सर्व समाज एकवटणार आहे. संगमनेरकरांनी दिलेल्या हाकेचा संदेश हा मोलाचा ठरणार असून आता समाज एक ऊर्जास्त्रोत असलेला नव्या दिशेचा, नव विचाराचा विश्वकर्माचा स्तंभ उभा करणार आहे.
अतिथींना अगत्याचे आमंत्रण ! आपलेच स्नेहांकित !! विश्वकर्मा तांबट समाज संगमनेर !!!