सिद्धार्थ नाईट हायस्कूल , संगमनेर येथे इ. १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ कार्यक्रमाचे आयोजन.
संगमनेर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अष्टपैलू व्यक्तिमत्व कालकथित दादासाहेब रुपवते यांच्या प्रेरणेने आणि विचाराने स्थापन झालेल्या बहुजन शिक्षण संघाच्या सिद्धार्थ नाईट हायस्कूल , संगमनेर येथे रयतेचे राजे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला सिद्धार्थ नाईट हायस्कूल , संगमनेर येथील 2024 - 2025 या वर्षातील इयत्ता दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
21 फेब्रुवारी 2025 पासून इयत्ता दहावीची अर्थात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरू होणार आहे. त्यासाठी सिद्धार्थ नाईट हायस्कूल , संगमनेर येथे इयत्ता दहावी मध्ये 2024 - 2025 या वर्षांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभाचे आयोजन विद्यालयाकडून करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांकडून प्रत्येक विषय शिक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी यांचा फेटा बांधून आणि पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले तसेच इयत्ता दहावीतील बॅच कडून शाळेसाठी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची अर्थात उद्देशिकाची मोठी फोटोफ्रेम सप्रेम भेट म्हणून देण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री पवार डी. बी. सर ,वर्गशिक्षक श्री जगताप विकास सर तसेच इतर शिक्षकांनी मार्गदर्शन करून परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी श्री पवार सरांनी विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेला जाताना मनात कोणतीही भीती न बाळगता आपल्या स्वतःच्या कष्टावर , स्वतःच्या अभ्यासावर , स्वतःच्या ज्ञानावर विश्वास ठेवून परीक्षा देऊन तुम्ही सर्व जण निश्चित चांगल्या गुणांनी पास होणार अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच वर्गशिक्षक श्री जगताप सरांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाची तयारी कशा पद्धतीने करावी. परीक्षेला जाताना प्रत्येक विद्यार्थ्याने चांगले गुण मिळविण्यासाठी कोणत्या .टिप्स वापराव्यात. भविष्यात आपण स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे करिअर , स्वतःचा व्यवसाय कसा यशस्वी करावा. आपण सर्व विद्यार्थी या शाळेचे कायम हितचिंतक असणार आहात. या शाळेची दरवाजे आपणासाठी कायम खुली आहेत. म्हणून ज्या प्रकारे तुमच्या जीवनात या रात्र शाळेत प्रवेश घेऊन प्रकाश निर्माण झाला. त्याच पद्धतीने समाज व्यवस्थेमधील तुमचे नातेवाईक , मित्रपरिवार आणि शेजारी असे अनेक गरजवंत विद्यार्थी आजही शिक्षणापासून वंचित आहेत. अशा विद्यार्थ्यांना सिद्धार्थ नाईट हायस्कूल , संगमनेर येथे पुढील वर्षी प्रवेशासाठी घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी श्रीमती सांबरे मॅडम, श्रीमती वाकचौरे मॅडम , श्रीमती चोपडे मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. इयत्ता दहावीतील अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी संपूर्ण वर्षांमध्ये शाळेविषयीचे अनुभव कथन केले. काही विद्यार्थी बोलत असताना भावनिक झाले. कारण या शाळेतील त्यांना आज निरोप दिला जात आहे अशी भावना देखील व्यक्त करण्यात आली. सर्व विद्यार्थी अत्यंत आनंदात हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सुंदर पोशाखामध्ये उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी कार्यालयीन कर्मचारी देखील उपस्थित होते. त्यामध्ये कार्यालयीन लिपिक आणि शिक्षक श्री वसीम मनियार सर ,श्रीमती कासार मॅडम , श्री वाघमारे विलास , श्री राघू गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सर्व सूत्रसंचालन आणि आभार श्री माळी ज्ञानेश्वर या विद्यार्थ्याने केले.
-------------------------------
ॲड. विकास जगताप सर
मो. 9922876008 / 8999503447
---------------------------------
आपणास विनंती आहे की , अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या हक्काच्या -
राजगृह न्युज चॅनलला -
https://rajgriha.in/
युट्युब चॅनेलला -
https://youtube.com/@prof.vikasb.jagtapsir.7282?si=7hRUIOgJNM4lqyLl
फेसबुक पेजला -
https://www.facebook.com/share/18JqJ2BzDU/
व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा -
https://chat.whatsapp.com/HjMw7i3tZZ0K9okXPm9KHi
व्हॉटसॲप चॅनलला -
https://whatsapp.com/channel/0029Vasu8HZIt5s4Z3apXH45
जास्तीत जास्त लोकांनी लोकांपर्यंत
# लाईक करा @
# शेअर करा @
# सबस्क्राईब करा @
कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..