संगमनेर श्रमिकच्या विद्यार्थ्यांनी गडचिरोलीत राखला गड ; राज्यस्तरीय रिंग टेनिस स्पर्धा संपन्न
संगमनेर [ प्रतिनिधी ]
गडचिरोली येथे घेण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय रिंग टेनिस स्पर्धेत संगमनेर श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षा खालील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे मयूर रमेश,पैयावुल तन्मय भागवत उगले,राधेय विजय पवार अमृत माधव राहणे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संगमनेर श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयास शालेय राज्यस्तरीय रिंग टेनिस स्पर्धेत विजेते पद मिळाले असून सदर स्पर्धा ही शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे घेण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे व भारतीय शालेय खेळ महासंघ व संबंधित खेळाच्या राष्ट्रीय एकविध खेळ संघटनेच्या नियमावली नुसार आणि मार्गदर्शक तत्त्वानुसार करण्यात येते. विजयी संघाचे शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, सचिव अनिल राठी,प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक प्रा.आप्पासाहेब गुंजाळ, जिमखाना विभागाचे प्रा. निलेश गुंजाळ, प्रा. भागवत उगले, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.