शिक्षण

नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलपासूनच, तर कामकाजासाठी २३४ दिवस; शिक्षणमंत्र्यांची माहिती

Blog Image
एकूण दृश्ये: 453

नविण शैक्षणिक वर्ष एप्रिलपासूनच, तर कामकाजासाठी २३४ दिवस; शिक्षणमंत्र्यांची माहिती 

संगमनेर -

आतापर्यंत १५ एप्रिलपर्यंत परीक्षा घेण्याची पद्धत रूढ होती. मात्र, नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा मार्चपर्यंत पूर्ण करून नवीन २०२५-२६ हे शैक्षणिक वर्ष  एप्रिलपासून सुरू केले जाणार आहे. या शैक्षणिक वर्षाच्या कामकाजाचे दिवस २३४  असणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी विशेष वर्ग घेतले जाणार असून, शालेय शिक्षणात नवे बदल होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. 

विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग घेण्यात येणार असून, त्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे हे मुख्य उद्दिष्ट समोर ठेवून सामूहिक प्रयत्न करावे लागणार आहेत, असे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. 

----- Advertisements -----

राज्यातील शाळांमध्ये पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा, संकलित चाचणी २ यासाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकामुळे निर्माण होणाऱ्या समस्या शिक्षकांकडून मांडण्यात आल्या. त्या समस्यांना उत्तरेही देण्यात आली आहेत. त्यामुळे आता नव्या रचनेनुसार शैक्षणिक कामकाज २३४ दिवस करावे लागणार आहे, असे राहुल रेखावार यांनी सांगितले. 

 

राज्यातील पहिली ते नववीच्या परीक्षा एकाच वेळी घेण्यासाठीचे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने जाहीर केले आहे. त्यानुसार ८ ते २५ एप्रिल या कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणी, संकलित चाचणी २ या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत लांबणार असल्याने उत्तरपत्रिका तपासणे, निकाल तयार करण्यास वेळच मिळणार नसल्याचा मुद्दा शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात आला.

या निर्णयाचे पडसाद संपूर्ण राज्यभर पाहायला मिळणार आहे. कारण समाजातील सर्वच घटकांकडून या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. शासनाने यावर पुन्हा विचार करून निर्णय करावा असे समाजातील विद्यार्थी ,पालक , शिक्षक , मुख्याध्यापक आणि शिक्षण तज्ञ यांच्याकडून करण्यात येत आहे. याची विविध कारणे दिली जात आहे. त्यामध्ये उन्हाचा प्रचंड कडाका पडल्यामुळे उष्णतेमुळे होणारे विविध आजार विद्यार्थ्यांना होऊ शकतात , पाण्याची भीषण कमतरता मराठवाडा , विदर्भ ,खानदेश यासारख्या विभागांमध्ये आहे. काही विद्यार्थी शहरात शिकत असलेले त्यांना गावाकडे जाण्याची ओढ लागलेली असते. त्यामुळे रेल्वे तसेच एसटीचे बुकिंग यापूर्वीच केलेले आहे. कोणताही  परीक्षेनंतर निकाल तयार होण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन , संकलित मूल्यमापन यासाठी पेपर तपासणी , गुण याद्या तयार करणे , त्यानंतर पुनर्मूल्यांकन , निकाल पत्रक तयार करणे, प्रगती पुस्तके तयार करणे या प्रक्रियेसाठी किमान 20 ते 25 दिवसांचा कालावधी पुरेसा असतो. तो या नवीन निर्णयामुळे मिळणार नाही. अशी टीका  शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या संघटनांकडून करण्यात येत आहे.

----- Advertisements -----

शांतीसाठी संघर्ष करा, पण संघर्ष शांततेसाठीच असावा.

स्वामी विवेकानंद
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin