* डॉ.प्रांजल खरात एमडी मेडिसिन मध्ये यश*
संगमनेर { प्रतिनिधी }
तालुक्यातील पठार भागातील पोखरी बाळेश्वर या खेडेगावातील डॉ..प्रांजल संजय खरात ने एमडी मेडिसिन मध्ये घवगवीत यश संपादन केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रांजल ने एम डी जनरल मेडिसीन ही सीट मिळून घवघवीत यश संपादन केले. तिचे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण पद्म रसिक शहा ,श्री दि.ग .सराफ विद्यालयात झाले. एमबीबीएस चे शिक्षण राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर आणि सध्या एमडी मेडिसिन मातोश्री मीनाताई ठाकरे हॉस्पिटल इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स वाशी नेरूळ येथे पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे. शालेय जीवनात प्राजंल ने विविध स्पर्धेत प्रावीण्य मिळवले. त्यामध्ये शिष्यवृत्ती, प्रज्ञा ,नवोदय, मंथन अशा अनेक परीक्षा उत्तीर्ण केल्याचेही यावेळी सांगितले. तिने दहावीला 94 टक्के गुण मिळून सातवी रँक मिळवली तर बारावी मध्ये 89. .91% गुण मिळवून सायन्स मध्ये दुसरी रँक मिळवली. प्रांजलला चित्रकला , वाचनाची आवड असून तिची आंतराळ (नासा) मध्ये जाण्याची इच्छा होती. परंतु जीईई मधून आयआयटीचे सिलेक्शन झाले. नीट मेडिकल मध्ये नंबर लागला. तिचा भाऊही डॉ. आहे. आई गृहिणी असून घरकामात मदत करून अभ्यासात जास्त लक्ष घातल्याने मी हे यश संपादन करू शकले असे ती म्हणाली. दि ग सराफ विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक संजय खरात यांची ती मुलगी होय.