भारत

व्यंगचित्र स्पर्धेत आनंद गायकवाड प्रथम ;

Blog Image
एकूण दृश्ये: 14

व्यंगचित्र स्पर्धेत आनंद गायकवाड प्रथम ;देशभरातील विविध व्यंगचित्रे मिळणार पहावयास; नागराज मंजुळेंच्या हस्ते उद्घाटन 

    संगमनेर -

विवेक रेषाचे विवेकवादी विचार असलेले महाराष्ट्रातील पहिल्या व्यंगचित्राचे प्रदर्शन पुणे येथे होणार आहे. त्याचे उद्घाटन दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या हस्ते शनिवार ५ एप्रिल ला सकाळी ११ होणार आहे. 

        अंधश्रध्दा व भोंदूगिरी विरोधात सातत्याने जन- जागृती करुन, महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष , अधोरी, दुष्कर्म, प्रथा आणि काळी जादू विरोधात अधिनियम २०१३ चा कायदा आणणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने आयोजित केलेल्या विवेकरेषा या राज्यस्तरावरील व्यंगचित्र स्पर्धेत खुल्या गटात चित्रकार आनंद गायकवाड यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.

मार्मिकचे व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या या स्पर्धेला राज्यभरातून भरभरुन प्रतिसाद मिळाला. पुणे येथील बालगंधर्व कला दालनात होणाऱ्या या प्रदर्शनामध्ये अंधश्रद्धा, भोंदुगिरी आणि अज्ञाना विरुद्ध रेखाटलेल्या सुमारे १५० निवडक व्यंगचित्रांचा समावेश असेल. ५, ६ व ७ एप्रिल रोजी होणाऱ्या या तीन दिवशीय प्रदर्शनात भारतातील निवडक २५ प्रतिभावंत व्यंग चित्रकारांनी काढलेली चित्रे लावली जाणार असून स्पर्धेतील लहान मोठ्या गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या शिवाय राज्यातील इतर निवडक व्यंग चित्रकारांच्या कलाकृतीला स्थान मिळणार आहे. 

----- Advertisements -----

अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मंजुल हे असतील तर प्रमुख वक्ते अरविंद जगताप उपस्थित राहणार आहेत. यावेळी पारितोषिक वितरण होईल. सायंकाळी ५ वाजता चित्रकार ओमकार बागवे यांचे कॉमिक स्ट्रिपचे प्रात्यक्षिक होणार आहे. रविवार ( ता. ६ ) एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मार्मिकचे व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांचे व्यंगचित्र प्रात्यक्षिक होणार असून, सायंकाळी ५ वाजता व्यंगचित्रकार घनश्याम देशमुख यांच्या "बोलक्या रेषा" या व्यंगचित्रांचे प्रात्यक्षिक सादर होणार आहे. सोमवार ( ता. ७ ) एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जयेश दळवी ॲनिमेशनची दुनिया हे प्रात्यक्षिक दाखवणार असून त्यानंतर सायंकाळी ६ वाजता व्यंगचित्र प्रदर्शनाचा समारोप होईल. तीनही दिवस अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते भारत विठ्ठलदास हे भोंदू बुवाच्या कारनाम्यावर तथाकथीत विविध चमत्कारांची प्रात्यक्षिके सादर करतील. या राज्यस्तरिय स्पर्धेत १० ते १६ वर्ष वयोगटात हृदय मनोज भंडारी (प्रथम)) मानसी दत्तात्रय पाटील ( द्वितीय ) तर अफताब हमीद शेख याने तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर १६ वर्षांवरील खुल्या गटात आनंद गायकवाड, संगमनेर ( प्रथम) , तुषार कुरणे द्वितीय तर नीरज सबनिस यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे. या विजेत्यांच्या चित्रांशिवाय या प्रदर्शनात दीपक नागलकर, धनराज गरड, नरेंद्र साबळे, प्रशांत कुडकर, सुरेश राऊत व संगमनेर येथील अरविंद गाडेकर यांच्या चित्रांचा समावेश आहे. प्रदर्शनास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर, दीपक गिरमे, मिलिंद देशमुख, तसेच अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष मधुकर अनाप यांनी केले आहे.

 _विविध राज्यातील व्यंग चित्रकारांची चित्रे ठेवली जाणार_ 

या व्यंगचित्र प्रदर्शनात सतीश आचार्य (कर्नाटक), मंजूल (महाराष्ट्र), उदय देब (पश्चिम बंगाल), सजिथ कुमार (केरळ), मृत्युंजय (तेलंगणा ), कप्तान ( मध्य प्रदेश ) राज कमल, दिशा चक्रवर्ती, शुभम भट्टाचार्जी, मिका अज़ीज़ ( पश्चिम बंगाल ) नितूपर्ण राजबोंगशी (आसाम) क्रित्यम जैन (मध्य प्रदेश ) तर महाराष्ट्रातून घनश्याम देशमुख, भटू बागले, गिरीश सहस्त्रबुद्धे, रवी राणे, उदय मोहिते, सिद्धांत जुमडे, गौरव सर्जेराव, अमोल ठाकूर, ओमकार बागवे, कपिल गायकवाड, जयेश दळवी, राधा गावडे, वासुदेव बोंद्रे या देशभरातील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांची चित्रे पहावयास मिळणार आहे.

स्वप्न पाहा आणि ते साकार करण्यासाठी मेहनत करा.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin