उध्दव ठाकरे गटाने केला दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध दिल्या पाक मुर्दाबादच्या घोषणा
संगमनेर
जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी संगमनेर उध्दव ठाकरे शिवसेनेच्या वतीने एकजूट दाखवत पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. एवढेच नव्हे तर या भ्याड हल्ल्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांनी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी ही मागणी शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली. आंदोलन कर्ते म्हणाले की, पूर्वी काँग्रेस काळात अनेक वेळा असे दहशतवादी हल्ले होत होते या दहशतवादी हल्ल्याला वैतागूनच लोकांनी काँग्रेसला घरी बसवले .भारतात शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून भारतीय नागरिकांनी भाजप सरकारला निवडून दिले. आणि हिंदुत्ववादी सरकार उदयास आले. भाजपच्या काळात देखील पुलवामा सारखा भयंकर हल्ला झाला आणि त्यानंतर आता पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर . आता भाजपला देखील घरी बसवायची वेळ आली आहे असे मत शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी व्यक्त केले. महिला आघाडी तालुका प्रमुख शीतल हासे अजीज मोमीन आसिफ भाई तांबोळी ,पप्पू कानकाटे, अमित चव्हाण, अशोक सातपुते, यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. सरकार ने पाकिस्तानच्या क्रूर हल्ल्याला जशास तसे उत्तर द्यावे. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा दिल्या .देशाची कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करीत दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्याची मागणी यावेळी अनेक शिवसैनिकांनी व्यक्त केली. यावेळी माजी शहर प्रमुख अमर कतारी शिवसेनेचे अशोक सातपुते, अपंग सहाय्यसेना जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण.शिवसेना शहर प्रमुख पप्पू कानकाटे महिला आघाडी तालुकाप्रमुख शीतल हासे महिला आघाडी शहर प्रमुख वैशाली वडतले. व्यापारी आघाडी शहर प्रमुख संभवशेठ लोढा ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख सदाशिव हासे. शिव आरोग्य सेना जिल्हा समन्वयक अजीज मोमीन. वाहतूक सेना शहरप्रमुख इम्तियाज शेख शिवसेना उपशहर प्रमुख वेणुगोपाल लाहोटी. शहर समन्वयक आसिफ भाई तांबोळी युवा सेना माजी तालुकाप्रमुख राजू सातपुते कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य विजय सातपुते युवा सेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे. शिवसैनिक त्रिलोक कतारी, विभागप्रमुख प्रशांत खजुरे शाखाप्रमुख प्रकाश चोथवे. माझी संपर्क प्रमुख श्री राहाणे, प्रकाश गायकवाड, अमित फटांगरे, एसटी कामगार सेना, रिक्षा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.