*दुसऱ्या विपरीत घटनेने चर्चेला आले उधान; संगमनेर मध्ये नागरिकाची उडाली तारांबळ*
संगमनेर
चैत्र पौर्णिमा आरंभी हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर संगमनेर शहरातून रथ उत्सवाला प्रारंभ होत असतांना ढोल ताशा पथक आणि अन्य काही युवकांमध्ये किरकोळ कारण पुढे करीत ढोल वाजविण्यावरून तसेच रथ लवकर ओढण्यावरून वादावादी झाली. शहरातील रथोत्सव हा सव्वाशे वर्षापासून धार्मिक परंपरा जपणारा गावचा उत्सव आहे. या ऐतिहासिक धार्मिक उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने वादावादी करणा-या युवकांना शांत करण्यात यश मिल्याने मारुतीरायाचा हा रथ मार्गक्रमण करून पुन्हा परतीची मिरवणूक करीत मारुती मंदिरात येताच रथोत्सावाचा समारोह करण्यात आला.
सायंकाळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते आरती करून तमाम भक्तगणासह संगमनेरकरांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. काही वेळाने या ठिकाणावरून मंत्री विखे पाटील आमदार खताळ मार्गस्थ झाले. थोड्याच वेळात चंद्रशेखर चौकात या ठिकाणी दारूच्या फटाक्यांची विविध रंगीबेरंगी आकर्षक अशी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. ही आतषबाजी बघण्यासठी तोबा गर्दी जमली होती. आतषबाजी सुरू असतानाच चौकातील एका घरावर फटाका पडल्याने परसरामी यांच्या जुन्या घरावर वाळलेल्या गवताने लगेच भेट घेतला. धुराच्या लोळाकडे बघ्यापैकी काहीचे लक्ष गेले. घराच्या वरबाजुला आग पसरल्याने सर्वत्र धूर दिसायला लागल्याने नागरिकांमध्ये आग लागल्याच्या चर्चेला चांगलेच उधान आले . एवढ्यात आग लागली आग लागली असा आक्रोश करीत नागरिकांची चांगलीच धावपळ झाल्याने त्या ठिकाणी एकच तारांबळ उडाल्याचे बघायला मिळाले. दरम्यान संगमनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करताच तात्काळ अग्निशमन दलााची गाडी तत्काा हजर झाली खरी परंतु रस्त्याच्या मधोमध आडव्या तिरक्या लावलेल्या दुखाची, चार चाकी गाड्याने अग्निशमन दलास काही काळ चांगलाच अडथळा निर्माण झाला. तोपर्यंत परसरामी यांच्या घरावरील वाळलेले गवत जळून खाक झाले होते. त्यातच या ठिकाणी लागलेली आग विजण्यासाठी युवकांनी शर्तीचे प्रयत्न केले. पुरोहित संघाचे भाऊ जाखडी म्हणाले की, पालिकेचे अग्निशमनही तत्पर दाखल झाले. पुढील दक्षता लक्षात घेत आग विझविण्यासाठी फायर ब्रिगेड ने प्रयत्नही केला. परंतु तोपर्यंत आग पूर्णत; विझलेली लक्षात आले. विशेष दक्षता म्हणून संगमनेर नगरपालिकेच्या अग्निशमनदलाने या ठिकाणी पाण्याचा फवारा मारल्याचे त्यांनी सांगितले.