दिल्लीत होणार शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक संदीप वाकचौरेंच्या दोन पुस्तकाचे प्रकाशन
संगमनेर { प्रतिनिधी }
शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक संदीप वाकचौरे यांचे चपराक प्रकाशनाचे वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या "शिक्षणरंग, आणि शिक्षणावर बोलू काही" या दोन पुस्तकांचे प्रकाशन दिल्ली येथे होणार आहे. यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी साहित्यातील अमृतकुंभ ठरणार आहे. दिल्लीत होणा-या साहित्य संमेलनाचे औचित्य विशेष राहणार असून त्या मागचे कारणही तसेच आहे. मराठी साहित्य संमेलन शतकोत्तरीकडे वाटचाल करीत आहे तर संपूर्ण देशच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने या "अभिजात मराठी भाषेच्या जागरास" दिग्गज सारस्वतांच्या मांदियाळीत हा देदिप्यमान सोहळ्याचा आनंदोत्सवच राजधानीत रंगणार असल्याने संगमनेर येथील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक संदीप वाकचौरे यांच्या दोन पुस्तकाचे प्रकाशन मान्यगनांच्या हस्ते होणार आहे. संगमनेर वासियांसाठी आणि भाषाप्रेमी साठी ही एक दुर्मिळ पर्वणीच आहे. एक प्रकाशक, एक लेखक एक विषय असे एकूण बारा पुस्तके प्रकाशित करण्यात आले आहेत. या शिक्षण मालिकेतील ही शेवटची दोन पुस्तके दिल्लीत 21 ते 23 फेब्रुवारी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन प्रकाशित केली जाणार असल्याची माहिती चपराकचे प्रमुख घनश्याम पाटील यांनी दिली. श्री वाकचौरे यांची यापूर्वी चपराक प्रकाशाच्या माध्यमातून दहा पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. तर तीन पुस्तके इतर प्रकाशनाकडून प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील घडामोडींचा आणि विविध प्रश्नांचे संदर्भीय प्रतिपाद्य मांडण्यात आले आहे. वाकचौरे यांनी प्रासंगिक स्वरूपात मुबलक लेखन केले आहे. यापूर्वी विनोबा , कृष्णमूर्ती, संत ज्ञानेश्वर, गिजूभाई बधेका यांच्या संदर्भातील शिक्षण विचारावर त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सातत्याने महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांचे स्तंभलेखन प्रकाशित करण्यात येत आहे. एकूणच राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा मौलिक सहभाग राहिला आहे. राज्य अभ्यासक्रम निर्मिती तआहे मूल्यमापन, शासनाच्या इतर प्रशिक्षण साहित्य निर्मितीत, प्रशिक्षणातही तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे.
-----------------------------------------
ॲड. विकास जगताप सर
मो. 9922876008 / 8999503447
-----------------------------------------
आपणास विनंती आहे की , अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या हक्काच्या -
राजगृह न्युज चॅनलला -
https://rajgriha.in/
युट्युब चॅनेलला -
https://youtube.com/@prof.vikasb.jagtapsir.7282?si=7hRUIOgJNM4lqyLl
फेसबुक पेजला -
https://www.facebook.com/share/18JqJ2BzDU/
व्हॉटसॲप चॅनलला -
https://whatsapp.com/channel/0029Vasu8HZIt5s4Z3apXH45
जास्तीत जास्त लोकांनी लोकांपर्यंत
# लाईक करा @
# शेअर करा @
# सबस्क्राईब करा @
कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏