19) *_तो छबिना नाही! आकर्षक फटाक्याची आतषबाजी_* 35 -40 वर्षा पूर्वी रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत हनुमान जयंतीला छबिना निघत असे हनुमानजींचे मंत्रोच्चार आरती, सामाजिक प्रबोधन, धार्मिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यासाठी रात्री 8 ते 10 या वेळेत रथावर विद्युत रोषणाई, दीपोत्सव करून छबिना निघत असे. त्या दरम्यान काही अनुचित घटनेमुळे गेली 35 -40 वर्षांपासून छबिना काढण्याची प्रथा बंद पडली आहे. रथयात्रेनंतर आता सायंकाळी सात नंतर दारूच्या शोभेच्या विविधरंगी आकर्षक अशा फटाक्याच्या आतषबाजीने नागरिकांचे मनोरंजन केल्या जाते.
20) *_120 वर्षाच्या रथ कारकीर्दीवर यांनी टाकला प्रकाशझोत__* संगमनेर नगरपालिकेने 22 ऑक्टोबर 1962 रोजी प्रकाशित केलेल्या शताब्दी विशेषांकात हनुमान जयंती आणि रथ उत्सवावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला. यामध्ये डॉ. आ. ग. गाडगे, श्री बाबुराव ढोले, कृ. सी. मराठे, शंकरराव जोशी, भाऊसाहेब जाजू, ज. न. मणियार, व. ग. देशपांडे, य. वि, हडप, डी. बी राठी, तलवार प्रेस चे प्रभाकर यादवराव सरोदे, आप्पासाहेब खरे, डॉ. संतोष खेडलेकर, पत्रकार शामजी तिवारी, विलास गुंजाळ , वसंत बंदावणे, नंदकुमार सुर्वे, गौतम गायकवाड, अनंत पांगारकर, सुनील नवले, राजा वराट, दैनिक भास्कर, सकाळ, लोकसत्ता, लोकमत, सामना, पुण्यनगरी, दिव्य मराठी, स्थानिक सायं दैनिक आनंद, नायक, युवावार्ता, प्रवरातीर, प्रजा, प्रवरेचे पाणी अशा अनेक वृत्तपत्रांनी या घटनाक्रमावर वेळोवेळी लेख आणि बातमीतून प्रकाशझोत टाकला.
21) *_12 एप्रिल 2025 ला महोत्सवाला लागले गालबोट*_* रथोत्सवा दरम्यान दोन गटांमध्ये वाद झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला ; ---- जेव्हा महिलांनी रथ ओढण्याचा प्रयत्न केला आणि मिरवणुकीतील ढोलकी वाजवणाऱ्यांना ढोलकी वाजवण्यापासून रोखले तेव्हा रथ पुढे जाऊ शकला नाही. ढोल पथक आणि अन्य काही कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. दोघांमध्ये हाणामारीही झाली. या वादाचे पर्यवसान धक्काबुक्की आणि मारहाणी पर्यंत झाले. या घटनेला पोलिस निरीक्षक राहुल देशमुख आणि पोलीस पथकाने वेळीच आवर घातल्याने अनर्थ टळला. परंतु 120 वर्षांच्या या धार्मिक रथोत्सवालाही ग्रहण लागले.
पक्षीय मतभेद बाजुला सारून एकात्मता जपत विविध मर्दानी खेळाचे प्रात्याक्षिक दाखवणारे युवक
22) *_रात्रीच्या आगीने संगमनेर मध्ये नागरिकांची उडाली तारांबळ_* चंद्रशेखर चौकात सायंकाळी 7 वाजता या ठिकाणी दारूच्या फटाक्यांची विविध रंगीबेरंगी आकर्षक अशी आतषबाजी करण्यात आली. ही आतषबाजी बघण्यासाठी तोबा गर्दी जमली होती. ही आतषबाजी सुरू असतानाच चौकातील एका घरावर फटाका पडल्याने परशरामी यांच्या जुन्या घरावर वाळलेल्या गवताने लगेच पेट घेतला. धुराच्या लोळाकडे बघ्यापैकी काहीचे लक्ष गेले. घराच्या वरबाजुला आग पसरल्याने सर्वत्र धूर दिसायला लागल्याने नागरिकांमध्ये आग लागल्याच्या चर्चेला चांगलेच उधान आले . एवढ्यात आग लागली! , आग लागली !असा आक्रोश करीत नागरिकांची चांगलीच धावपळ झाल्याने त्या ठिकाणी एकच तारांबळ उडाली. दरम्यान संगमनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करताच तात्काळ अग्निशमन दल त्या ठिकाणी हजरही झाले खरे ! परंतु, रस्त्याच्या मधोमध आडव्या तिरक्या लावलेल्या दुखाची, चार चाकी गाड्याने अग्निशमन दलास चांगलाच अडथळा निर्माण झाला. तोपर्यंत परसरामी यांच्या घरावरील वाळलेले गवत जळून खाक झाले होते. त्यातच या ठिकाणी लागलेली आग विजण्यासाठी युवकांनी शर्तीचे प्रयत्न केले. पुरोहित संघाचे भाऊ जाखडी म्हणाले की, पालिकेचे अग्निशमनही तत्पर दाखल झाले. पुढील दक्षता लक्षात घेत आग विझविण्यासाठी फायर ब्रिगेडने प्रयत्नही केला. परंतु तोपर्यंत आग पूर्णत; विझल्याचे लक्षात आले. विशेष दक्षता म्हणून संगमनेर नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाने या ठिकाणी पाण्याचा फवारा मारला. भविष्यात अशीच एखादी दुर्घटना घडू नये म्हणून अग्निशमन दलास आधीच पाचारण करून ठेवले पाहिजे अशी चर्चा तिथे रंगली. अन एकदाचे संकट टळले म्हणत हु $ श्य करीत नागरिक भक्त गणांची पावले मात्र भंडा-याच्या दिशेने वळाली .
_23) *सर्वांचा लाभतो सहयोग*_ या उत्सवामध्ये शहरातील तमाम नागरिकांसह, श्रीराम नवमी व हनुमान उत्सव समिती चे अध्यक्ष कमलाकर भालेकर योगीराज परदेशी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी यांचेही मोलाचे योगदान लाभत असते.
24) *_संगमनेरचा ग्रामोत्सव रथोत्सव एकात्मतेचे प्रतीक_* दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर संगमनेर शहर, तालुका पंचक्रोशी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भक्तगण हा रथोत्सव पहावयास येतात. भल्या पहाटे मारुतीरायाला आणि श्रीरामाला अभिषेक करून पूजा, अर्चा, महाआरती करून रथ उत्सवाला पोलीस अधिकाऱ्यांनी झेंडा दाखवताच रणरागिणी महिला हा रथ ओढण्यास सुरुवात करतात. या उत्सवामध्ये लहान बालकासह अबाल वृद्ध महिला, युवा, युवती, मोठ्या संख्येने सहभागी होत या रथ उत्सवाचा आनंद घेतात.पारंपारिक आणि जुने साहित्य त्यामध्ये मुद्गल वेताची पातळ काठी, सनई चौघडा, ढोल ताशा, लेझीम पथक, व्दंदयुध्द, बाल वारकरी, मर्दानी खेळातून ही मिरवणूक रोमहर्षक होत जाते. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, एकविरा फाउंडेशनच्या डॉ. जयश्री थोरात, विद्यमान आमदार अमोल खताळ, नीलम खताळ, तमाम नागरिक आणि भक्तगणांना शुभेच्छा देऊन या महोत्सवा मध्ये आपला सहभाग घेत आनंद द्विगणित करतात.