सुगंध कॉलनीत वाढला दुर्गंध; घाणीचेही साम्राज्य, कॉरिडॉरमध्ये फिरणे झाले कठीण आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
संगमनेर
संगमनेरची कीर्ती दूरवर पसरली आहे. त्यात कला, क्रीडा, संस्कृती, शिक्षण आणि स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर, हरीत संगमनेर, त्याबद्दल आपण तमाम संगमनेरकरांनी अनेकदा ऐकले आहे. पण प्रत्यक्षात संगमनेरच्या सुगंध कॉलनीत कचऱ्याच्या दुर्गंधीने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांना फिरणे मुश्किल झाले आहे. परिसरातील नागरिकच उघड्यावर कचरा फेक असल्याने अस्तव्यस्त पडलेला कचर आणि प्लास्टिक भटके आणी जनावरे खात असल्याने जनावराच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होवू शकतो. नगरपालिकेने तातडीने याकडे लक्ष देवून. तोडगा काढावा अशी मागणी माजी नगरसेवक डॉ. शिवाजी कर्पे यांनी केली आहे. शहरातील सुगंध कॉलनीमध्ये पसरणाऱ्या दुर्गंधीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
याशिवाय परिसरात वृक्षारोपण संरक्षित करण्यासाठी जाळी देखील बसवण्यात आली. या जाळीत कचरा आणि पाण्याच्या बाटल्या टाकून नागरिक झाडांच्या वाढीस अडथळा आणत असल्याचे निदर्शनास येत आहे. सकाळी परिसरात फिरायला जाणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागतो. शहरातील रस्ते आणि मोकळ्या जागांवर नागरिक कचरा टाकत आहेत. शहरातील मोकळ्या जागांचा वापर नागरिक कचराकुंडी म्हणून करत असल्याचे निदर्शनास आले आहे. स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर! हे फक्त जाहिराती आणि दिखावा करण्यासाठी ? असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
संगमनेर हे असे ठिकाण आहे जे निसर्गाशी नाते जोडायला शिकवते विकृतीशी नाही ? शहरवासीयांवर आत अशी म्हणण्याची वेळ आली आहे की, नगरपालिकेचे अभियान" माझी वसुंधराच आता कोणत्या गोंधळात पडले ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत असून तात्काळ ह्यागोष्टीकडे लक्ष देतील असा आशावाद लोकांनी व्यक्त केला आहे.