संगमनेर नगर पालिकेचा 'द्रविडी प्राणायाम' अजब कसरत करत घेतली दखल ; पालिकेच्या गजब कारभारावर मात्र प्रश्नचिन्ह ! थ्री स्टार मानांकनाचे पुढे झाले काय ?
संगमनेर
स्वच्छ, सुंदर, हरित संगमनेर हा पालिकेचा गाजावाजा सर्वश्रुत झालेला सर्वांनी ऐकला खरा ! परंतु, शहरातील "सुगंध "असे छान नाव असलेल्या कॉलनीत मात्र दुर्गंध पसरवणारे कच-याचे ढिग, इतस्तत: अन अस्त व्यस्त पडलेला प्लास्टिकचा सुमार कचरा , वृक्षारोपण केलेल्या तार कंपाउंड मध्ये खळातील बखळ कचरा बातमीच्या माध्यमातून व्हायरल होताच नगर पालिकेकडून त्याची गांभीर्य नसलेली दखल घेतली खरी ! परंतु, हीच तार कंपाउंडची कसरत करणारी आणि द्रविडी प्राणायाम करणारी ठरली असल्याने पालिका कर्मचा-यांचा गलथान कारभार पहावयास मिळत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, जाणता राजा मैदान परिसरातील उच्चभ्रू मानल्या जाणा-या परिसरात भल्या पहाटे शहरातील सजग ज्येष्ठ नागरिक "अरोग्य धन संपदा" म्हणत दररोज व्यायाम, कसरत , आणि प्राणायाम राम पहा-यातील फेर फटका मारतांना दिसून येतात. त्यांनाही परिसरातील आजूबाजूला घडत असलेल्या घटनेचा मोह आवरत नाही अन तो क्षण आपल्या कॅमेरा टिपून तो पालिकेच्या निदर्शनास आणून देत अशा घटनेस लवकर आवर घालण्यासाठी ते इशारा देतात. याबाबत सजग असलेले डॉक्टर शिवाजी करपे काय म्हणतात पहा हा व्हिडिओ "राजगृह न्यूज" वर.
एकीकडे ज्येष्ठ नागरिकांचा प्राणायाम आणि नगर पालिकेचा झालेला द्रविडी प्राणायाम, शरीर बळकटी साठी नागरिक करत असलेली कसरत आणि पालिकेची तार कंपाउंडची तारेची कसरत हा अजब गजब कारभार पहावयाची वेळ संगमनेर करांवर येऊन ठेपली. पालिकेने दखल तर घेतली. परंतु त्याची ही दखल द्रविडी प्राणायाम करतांना दिसून येत आहे. कदाचित नागरिक शीर्षासन करतांना बहुदा पालिका कर्मचाऱ्यांना तर वाटले नसेल ना! शीर्षासन करताना झालेला हा द्रविडी प्राणायाम नागरिकाना नीट वाचता यावा की काय असा सवाल नागरिक आता करू लागले आहेत
थ्री स्टार मानांकनाचे पुढे झाले काय ? कचरा मुक्त शहर असे थ्री स्टार मानांकन नगरपालिकेने मिळवलेले आहे. देशातील तिसरा क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याने पालिकेचा लौकिक वाढला होता. कदाचित नगर पालिका हा पुरस्कार विसरली तर नाही ना अशी जनभावना सर्वसामान्य नागरिकांतून उमटताना दिसून येत आहे.