भारत

नागरिकांच्या वर्तणुकीचाच त्रास होतो नागरिकांना ! नि जनावरांना !!

Blog Image
एकूण दृश्ये: 89

नागरिकांच्या वर्तणुकीचाच त्रास होतो नागरिकांना ! नि जनावरांना !! आपल्यात कधी करणार आपण बदल ? नागरिकातच रंगली चर्चा

    संगमनेर 

नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर वाभाडे काढण्याचे काम नागरिकांमधून सातत्याने होत असले. यास नागरिकच जबाबदार नाही का ? असा प्रश्न आता नागरिकच नागरिकांना करू लागल्याचे दिसून येत आहे. "राजगृह" ने जनमाणसांनी टिपलेलेल्या छायाचित्राचा कानोसा घेत त्यास वाचा फोडण्याचे आणि नगर पालिकेच्या कार्य पद्धतीवर हातोडा बसविण्यासाठी "राजगृह" ने आपल्या वृत्ताच्या माध्यमातून तसेच नागरिक आणि प्रशासनाला धारेवर धरत यावर अंकुश बसवण्यासाठी शहरातील काही घटनांचा आढावा घेऊन ते प्रसारित करण्याचे काम केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी अनेक भागातील काही क्षणचित्रे आणि फोटो आमच्यापर्यंत पोहोचून परिसरात वाढत चाललेली अस्वच्छता, दुर्गंधी आणि जनावराचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 उघड्यावरील कचरा आणि कॅरीबॅग मध्ये असलेले फळ कचरा या गाई कॅरीबॅग सह खाताना दिसून येतात. कॅरीबॅग आणि कचरा खाल्ल्याने गायीचे आरोग्य धोक्यात येत असते. जनावरांना शारीरिक इजा होऊन जनावर दगावू शकतात. दरम्यान काही दिवसापूर्वी एक गाय दगावल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे ? नगर पालिकेने याबाबत दक्षता घेऊन शहर परिसरात जागोजाग पडत असलेला कचरा यावर काय कारवाई करेल याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. परंतु या सर्व घटनेस आपणच जबाबदार तर नाही ना असा प्रश्न आता नागरिकच नागरिकाला करू लागले आहे.

----- Advertisements -----

यावर आता संगमनेर नगरपालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले असून, नागरिकांच्या वर्तणुकीचाच त्रास होतो नागरिकांना ! नि जनावरांना !! आपल्यात कधी बदल करणार आपण ? अशी नागरिकातच चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांनी पाठवलेले काही क्षणचित्र ; उघड्यावर टाकलेला कचरा, कॅरीबॅग आणि जनावरे

शिक्षणाशिवाय जीवन अधू आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin