भारत

मिरवणूकीच्या वादात 21 जणांविरुद्ध परस्पर गुन्हे दाखल_*

Blog Image
एकूण दृश्ये: 111

25) *पेशवे काळातही होते खरे परिवाराचे शिल्पकलेत योगदान* 

___ शिल्पकार सुंदरराव आणि नामदेवराव मिस्त्री ( खरे ) बंधू यांचे पूर्वज पेशव्यांच्या दरबारात होते. शनिवारवाडा बांधकामाच्या कलाकुसरीत त्यांचा सहभाग आणि योगदान महत्वपूर्ण होते. शनिवारवाड्यात प्रवेश करताना दर्शनी भागात फलकावर शिवराम कृष्णा देवजी सुतार यांचा उल्लेख आहे खरे परिवाराचे संगमनेरात वास्तव्य असून अनेक सार्वजनिक धार्मिक क्षेत्रात तन-मन-धनाने सहभागी होतात. सुंदरराव मिस्त्री यांनी अहिल्यानगर नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी कास्ट, पाषाण, सिमेंटच्या कलाकृती, मूर्ती, सभामंडप, देवघर तयार केले आहेत. अध्यापक आप्पासाहेब खरे यांनी तो अल्बम पुस्तकरूपी अनमोल ठेवा "शिल्पकलेतील अनमोल मोती" प्रकाशित केला आहे.

26 ) *_हनुमान रथ मिरवणूकीच्या वादात 21 जणांविरुद्ध परस्पर गुन्हे दाखल_* _____हनुमान जयंती निमित्त संगमनेर शहरात काढण्यात आलेल्या रथोत्सव मिरवणूकीत झालेल्या वादात 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. क्रॉस तक्रार देताच आणखी 10 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

       चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीला मोठ्या उत्सवात रथोत्सव साजरा केला जातो. गेली अनेक वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. त्या अनुसंगाने दि. १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे या वर्षी मिरवणूक काढली होती. परंतु बाचाबाचीतून आणि किरकोळ कारणावरून या मिरवणूकीत चांगलेच वादंग झाले होते. आणि 120 वर्षाची परंपरा असलेल्या या ग्राम उत्सवाला गालबोट लागले. हनुमान जयंती उत्सव समितीचे प्रमुख कमलाकर भालेकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी 11 जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर याच प्रकरणी तब्बल 12 दिवसानंतर रविवारी परस्पर विरुद्ध फिर्याद दिल्याने विरोधी गटातील 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ललित शरद शिंपी अच्युत नगर, यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून शहर पोलिसांनी कमलाकर विश्वनाथ भालेकर, योगराज कुंदनसिंग परदेशी, चेतन विलास तारे, अक्षय अविनाश थोरात, हर्ष शामसुंदर जोशी, शामसुंदर रामेश्वर जोशी, गिरीष राजेंद्र मेंद्रे, बीजेपी माजी शहराध्यक्ष एड. श्रीराम अरविंद गणपुले, भगवान तुकाराम गिते, शुभम चंद्रकांत लहामगे सर्व संगमनेर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 119 (1) 189 (2) 191 (2) 115 (2) 352 351 (2) 190 अशा विविध कलमान्वये दहा अरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

----- Advertisements -----

27 ) शहरात हनुमान जयंतीचा ऐतिहासिक आणि धार्मिक उत्सव हा रथोत्सवाने साजरा केला जातो. संगमनेर शहरातील मुख्य आकर्षण असलेल्या "हनुमान विजय रथ" उत्सवा दरम्यान झालेल्या दंगल आणि हिंसाचार प्रकरणी शहर पोलिसांनी अखेर ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हनुमान जयंतीच्या एक दिवस आधी ११ एप्रिल आणि दुसऱ्या दिवशी १२ एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेबाबत शहर पोलिसांनी १४ एप्रिल रोजी रात्री १०:३० वाजता गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये विनायक पुंडलिक गरुडकर, सौरभ रमेश उमरजी, शेखर शिवाजी सोसे, अमोल दशरथ क्षीरसागर, श्याम मधुकर नालकर, सोनू गोविंद नारकर, शुभम मनोज परदेशी, ओंकार ननवरे, मयूर जाधव, राहुल शशिकांत नेहुलकर, राहुल शशिकांत नेहुलकर यांचा समावेश आहे. यापैकी अकरा जणांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराम नवमी आणि हनुमान जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष कमलाकर भालेकर आणि मयूर जाधव यांनी मार्ग अडवून मिरवणूक थांबवली होती. या दरम्यान राहुल नेहूलकर म्हणाले की वाद्ये वाजवल्याशिवाय रथ पुढे जाऊ देणार नाही, यात वाद‌ झाला त्याचे पर्यवसान धराधरी मारमारीत झाले. धार्मिक उत्सवात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ११९ (१) १८९ (२) १९१ (२) १९१ (३) ११८,११५, १२५ (अ) १२६ (२) ६१ (२) ३००,३५२,३५१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत.

28)  *सामंजस्यातूनच तोडगा हाच एकमेव पर्याय*

__ हनुमान जयंतीचा रथोत्सव हा गावोत्सव आहे . अशा या धार्मिक उत्सवात काही प्रवृत्ती राजकारण आणू पाहत आहे. किंबहुना गटातटाची हेकेखोरी लादण्याचा प्रयत्न यातून केला जात असल्याचे येथील सुज्ञ नागरिकाचे म्हणणे आहे. अशा अपप्रवृत्तीमुळे ग्राम उत्सवाला गालबोट लावले जात आहे. सौ शहरी एक संगमनेरी, ब-या नव्हेत अशा कुरबुरी आणि हमरी तुमरी. हे कुठेतरी थांबणे अपेक्षित आहे .सुशिक्षित सुसंस्कृत अशा संगमनेरकरांसाठी निश्चितच चांगली बाब नसल्याची भावना सामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे. सामंजस्यातूनच यावर लवकर तोडगा निघणे क्रमप्राप्त ठरेल अशी भावना सर्वत्रच ऐकायला मिळत आहे.

29)_*असा धार्मिक ठेवा महाराष्ट्रात कुठेही नाही, एक व्हा ! रथ टिकवा ! :- अर्टिस्ट प्रमोद कांबळे*_ 

----- Advertisements -----

अनेक शहरात आणि गावात धार्मिक ऐतिहासिक ठेवे असतात. परंतु संगमनेर शहरातील रथोत्सवाचा धार्मिक ठेवा इतर शहराच्या तुलनेत अनमोल आहे. या रथ उत्सवात पक्ष विरहित ग्रामस्थांनी एक होवून रथ आणि उत्सव टिकवण्यासाठी पुढे आले पाहिजे. शिल्पकार खऱे यांच्या पूर्वजांचे आणि पिढीचे योगदान फार मोठे आहे. त्यांची कला अप्रतिम आहे , त्यांच्या कार्याची कायमस्वरूपी दखल घेतली पाहिजे. एकदा अनुचित प्रकार घडण्याआधी समितीने कार्यतत्पर आणि सजग राहावे असे मत ग्रेट -अर्टिस्ट प्रमोद कांबळे यांनी भावना व्यक्त केली.

समाप्त

यशस्वी माणूस तोच, जो प्रत्येक संकटाला संधी म्हणून पाहतो.

अज्ञात