मेडिकवर हॉस्पिटल मधील प्रकार, महिलेवर अत्याचार आरोपी फरार ; काठीचा केला वापर, महिला जखमी अर्पण ब्लड बँकेचा कर्मचारी नयन जैन विरुद्ध गुन्हा दाखल
संगमनेर
आठच दिवसापूर्वी शहरातील डॉ. अमोल कर्पे याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका ब्लड बँकेत नोकरी करणाऱ्या 26 वर्षीय महिलेचा तिचाच सहकारी असणाऱ्या नयन जैन या नराधमाने मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये तिचा विनयभंग केला. एवढ्या मोठ्या नावाजलेल्या रूग्णालयात सदरचा प्रकार घडल्याने रूग्णलयात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येऊन ठेपल्याने घडलेल्या प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यासह नाशिक, छत्रपती संभाजीनगर पु्ण्यातही चांगलीच खळबळ उडाली आहे.
घडलेल्या प्रकाराबाबत आणि उपलब्ध माहिती नुसार अर्पण रक्तपेढीत नोकरी करणाऱ्या आणि मूळच्या सिन्नर तालुक्यातील एका खेडे गावातील व सध्या संगमनेर मध्ये एका उपनगरात राहणाऱ्या 26 वर्षीय महिलेने शहर पोलीसात फिर्याद दिली.
रविवार दि. 6 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 4:45 च्या सुमारास शहरातील नामवंत असलेल्या मेडिकव्हर रुग्णालयातील ब्लड स्टोरेज रूममध्ये फिर्यादी महिलेचा तिचा सहकारी आरोपी नाव नयन जैन वय वर्ष 50 (रा.संगमनेर, मूळ जळगाव) याने फिर्यादी महिलेच्या गालाला हात लावून तिच्या पाठीवर हात फिरवून तिला किस करण्यासाठी पुढे आला. महिलेला काही तरी खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला काठीने मारहाण करून जखमी केले. यावर फिर्यादी महिलेने आरोपी जैन याला जोराने मागे लोटले. त्यावेळी नयन जैन त्या महिलेस म्हणाला कोणालाही काहीही सांगू नको, तुझ्या पाया पडतो ! असे म्हणत तू जर कोणाला सांगितले तर तुला सोडणार नाही अशी धमकी देत. लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य जैन याने या महिलेसोबत केले.
सदर प्रकरणी महिलेच्या फिर्यादी वरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 74,, 75 (1) 351 (2) अनुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरचा प्रकार मेडिकवर हॉस्पिटलमध्ये घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. याप्रकरणी शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल पवार पुढील तपास करीत आहेत.