भारत

*कोविडमुळे रथोत्सवाची परंपरा पुन्हा खंडित झाली होती *_

Blog Image
एकूण दृश्ये: 31

_13) *कोविडमुळे रथोत्सवाची परंपरा पुन्हा खंडित झाली होती *_

समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ विधिज्ञ श्रीराम गणपुले सांगतात की, 2019- 20 मध्ये कोविड महामारीमुळे हनुमान जयंती विजय रथोत्सवाची परंपरा पुन्हा एकदा खंडित झाली होती, 2022 ला पुन्हा एकदा विजय रथोत्सव सुरू झाला. योगायोग शनिवार 16 एप्रिल 2022 रोजी पुन्हा एकदा महिलांनी श्री हनुमान जयंतीचा विजयी रथ ओढला. ही परंपरा भविष्यात कधीही खंडित होऊ नये अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. गणपुले म्हणाले की, गतवर्षी श्रीराम नवमी-श्री हनुमान जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यामध्ये सोमनाथ पराई हे अध्यक्ष होते. यासोबतच समितीमध्ये 11 सदस्यांची नियुक्ती केली होती. 

 14)_*समितीने दक्षता घ्यावी*_ श्रीराम नवमी आणि हनुमान जयंती महोत्सवासाठी वर्षागणिक समितीची नेमणूक केल्या जाते. उत्सवावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी समितीने कर्तव्यदक्ष राहावे अशा सूचना नागरिकांमधून येत आहेत.

_15) *रथोत्सवाला योगदान देणारे वंशज*_ झुंबराबाईच्या धाडसाचे साक्षीदार असलेल्या संगमनेरच्या ८५ वर्षीय भागीरथी ढोरे सांगतात की, झुंबराबाई खूप धाडसी स्त्री होती. इंग्रज अधिकारी तिला चांगलेच घाबरले आणि तिचा आदरही करत. झुंबराबाईचे वंशज आजही संगमनेरमध्ये राहतात आणि विविध व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करून जीवन कंठत आहेत. तसेच बंकाबाई परदेशी यांचे वंशज आजही संगमनेर व नाशिक येथे राहतात. लीलाबाई पिंगळे (मोरोपंत पिगले यांचे वंशज). पिंगळे कुटुंबातील कोणीही आता संगमनेरमध्ये राहत नाही. सोनूबाई तांबे, बस्सीबाई ढोरे, गजीबाई पोकळे, ठकूबाई बुरसे यांचे वंशजही संगमनेरमध्ये राहतात.

 _16) *खरे परिवार व झुंबराबाई यांच्या वंशजांनी व्यक्त केली नाराजी*_ इंग्रजांना धैर्याने तोंड देणाऱ्या झुंबराबाईं या धाडसी महिलांच्या पाठिंब्याने महाबली हनुमान जयंती रथोत्सवाची खंडित झालेली परंपरा पुनरुज्जीवित केली, झुंबराबाई आणि तिच्या कुटुंबीयांना कालांतराने दुर्लक्षित व्हावे लागले. आजही श्री हनुमान जयंतीला विजय रथाची मिरवणूक काढली जाते, पण आज ना खरे आणि झुंबराबाईच्या वंशजांची आठवण होते ना त्यांच्या वंशजांना या मिरवणुकीत बोलावले जाते. आज झुंबराबाईचे वंशज छोटा व्यवसाय करून कसरतीचे जीवन जगत आहेत. झुंबराबाई यांच्या नंतर औसक अवसक कुटुंब आणि रथाचे शिल्पकार खरे कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याने दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. आप्पासाहेब खरे म्हणतात की, रथपूजेचे निमंत्रण देऊन रथाचे व्यवस्थित जतन संवर्धन करावे तसेच या रथाचे पावित्र आणि मजबूतपणा कायम टिकण्यासाठी गरजेपेक्षा कोणत्याही व्यक्तीला रथावर चढू देऊ नये, बसू देऊ नये कारण या रथात मारूतीराया विराजमान झालेले असतात. सभोवतीच्या गराड्यामुळे मारूतीचे दर्शन पण नीट होत नाही. रथावर चढणारे मारूती रायाकडे पाठ करून फोटो सेशन मध्ये मुश्गुल असतात. यास कुठे तरी मर्यादा आली पाहिजे , प्रतिबंध झाला पाहिजे अशी खंत आप्पासाहेब आणि खरे परिवारांनी व्यक्त केली.

 17) *_पुरूषांनीच ओढला 21 वर्ष रथ_* 1905 ते 1926 या काळात हनुमान जयंती निमित्त पुरुषवर्ग हा रथ ओढत असत परंतु आपला देश ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली असल्याने ब्रिटीश अधिकाऱ्यांनी रथ ओढण्यापासून पुरुषांना मनाई केली. रथ परंपरेवर बंदी घालण्यासाठी इंग्रजांनी अनेक प्रयत्न केले. पण रथ ओढण्याचा प्रयत्न केला गेलाच त्याचा फारसा उपयोग झाला नाही. 

----- Advertisements -----

18) _*सलग दोन वर्ष आणली ब़ंदी*_ गावातील नागरिकांनी रथ ओढण्याचा प्रयत्न केला असता ब्रिटिश सरकारने तो रोखला 1927-29 या दोन वर्षांची बंदी आणली. आणि रथ तेथेच सोडून रथाची पूजा केली गेली. .सोमेश्वर मंदिरा जवळ रथ थांबला, त्यानंतर पुन्हा एकदा रंगार गल्ली येथे असाच प्रयत्न करण्यात आला. काही दिवस पूजेनंतर गावात रथ मिरवून रथ परत मंदिरात नेण्यात आला. उत्सवासाठी नागरिक एकत्र आले आणि एक प्रचंड आंदोलन उभे राहिले ज्यामुळे इंग्रज घाबरले. कारण ही घटना स्वातंत्र चळलळीचाच एक भाग होता. 1927 -1929 मध्ये या उत्सवावर पुन्हा बंदी घालण्यात आली. दरम्यान ब्रिटीश पोलीस एका मुलाला अटक करण्याच्या इराद्याने व्यस्त होते. तुम्ही पुरुषांना विरोध करू शकता ? महिलांना नाही! अशी भूमिका महिलांनी घेतली. यावर ब्रिटीश अधिकारी हतबल झाले. ब्रिटीशांना पटवून देण्याच्या प्रयत्नात आठरा पगड जातीतील महिलांनी हा रथ पुढे चालवला. ही परंपरा आजही जपली जात आहे.

क्रमशः

स्वतःला ओळखणे हीच खरी प्रगतीची सुरुवात आहे.

महात्मा गांधी