भारत

गोवत्स प पू श्री राधाकृष्ण महाराजांचे जय घोषात स्वागत ;

Blog Image
एकूण दृश्ये: 46

गोवत्स प पू श्री राधाकृष्ण महाराजांचे जय घोषात स्वागत ; श्रीराम मंदिरापासून निघाली शोभायात्रा, 3:30 वा श्रीराम कथेला होणार आरंभ

    संगमनेर

गोवत्स परमपूज्य श्री राधाकृष्णजी महाराज यांचे संगमनेरनगरी मध्ये सकाळी 9:30 वाजता भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. चंद्रशेखर चौक येथील श्रीराम मंदिरात त्यांच्या हस्ते प्रभू श्रीरामची आरती करण्यात आली. तदनंतर चंद्रशेखर चौक येथून बाजारपेठ, नगरपालिका, मेनरोड, तेली खुंट, विठ्ठल मंदिरापर्यंत भव्य दिव्य अशा शोभायात्रेने संपूर्ण शहर भक्तिमय वातावरण दंगून गेले. यावेळी रुद्र प्रतिष्ठानच्या ढोल पथकाच्या गजरात वातावरणात एक लयबध्दता धरत प्रभू रामचंद्र की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय ,छत्रपती संभाजी महाराज की जय असा उद्घोष करीत या शोभायात्रेला सुरुवात झाली. महिला भगिनींनी आपल्या डोक्यावर तुळस घेऊन भगवंत नामाचा जप करत ही मिरवणूक मार्गस्थ झाली. राम आयेंगे आयेंगे आ जायेंगे शबरी रामललाच्या या गाण्यावर महिलांनी टाळाचा आणि टाळ्यांचा ठेका धरला.

  शोभायात्रा ठरली खास आकर्षण

माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे तसेच डॉ.जयश्री थोरात यांनी परमपूज्य श्रीराधाकृष्ण महाराजांचे आदरपूर्वक अतिथ्य केले. परमपूज्य श्री राधाकृष्ण महाराज यांच्या मधुर वाणीतून श्रीराम कथेला आज दि १ एप्रिल ला दुपारी ३:३० आरंभ होणार आहे ही कथा ९ एप्रिल पर्यंत चालणार आहे. या कथेमध्ये ५ तारखेला श्री सीता राम विवाह उत्सव सोहळा सायंकाळी ७ वाजता संपन्न होणार आहे. या धार्मिक उत्सव असलेल्या या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. ही शोभायात्रा विशेष आकर्षक ठरली 

या मध्ये :-

बालकांख, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्कींधाकांड, सुंदरकांड, लंकाकांड, उत्तराकांड यामधून मौलिक मार्गदर्शन मिळणार आहे. 

       कथा प्रसंग

----- Advertisements -----

पहिला दिवस श्रीराम कथा महात्मे, दुसरा दिवस शिव पार्वती विवाह, तिसरा दिवस श्रीराम जन्मोत्सव, चौथा दिवस बाललीला आणि धनुष्य यज्ञ पाचव्या दिवशी श्रीरामलला आणि माता जानकी यांचा भव्यदिव्य विवाह सोहळा संपन्न होणार असून सायंकाळी मिरवणूक हे मुख्य आकर्षण ठरणार आहे, सहावा दिवस वनवास प्रसंग संवाद , सातवा दिवस श्रीराम भरत ; भरत शबरी भेट, आठवा दिवस रामचरित्र लंका विजय ,नववा दिवस श्री राम राज्याभिषेक होणार आहे.

श्रम हेच यशाचे खरे साधन आहे.

लोकमान्य टिळक
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin