गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संगमनेर आगारात पाच नवीन बस दाखल, उर्वरित पाच बसेस आणणार लवकरच ;- आमदार खताळ युुती पदाधिका-यांची ट्रायल बेसवर बसमध्ये सैर
संगमनेर ( प्रतिनिधी )
संगमनेर आगारातील बस कमरता लक्षात घेवून आमदार अमोल खताळ यांनी दहा बसेसची मागणी केली होती. राज्याचे परिवहनमंत्री ना . प्रताप सरनाईक यांनी या महत्वपूर्ण मागणीचा विचार करून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संगमनेर आगारासाठी दहा पैकी पाच नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या. या बसेस दाखल होताच अमोल खताळ यांनी शुभारंभ केला. नव वर्षाच्या शुभेच्छाही दिल्यात. त्यांच्या समवेत युतीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात बस स्थानकापासून नाशिक रोड, जाणता राजा मैदान ,नवीन नगर रोड मार्गे ट्रायल बेसवर एक सैर करत वाहतुकीचीही पाहणीही केली. उर्वरित ५ बसेस लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील असा विश्वास आ अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
आगारात बसेस कमतरता असल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत याकडे खताळ यांनी लक्ष घालून संगमनेर आगारा साठी १० एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आ.अमोल खताळ यांनी परिवहनमंत्री ना प्रताप सरनाईक यांच्याकडे विधानभवनात भेट घेऊन केली होती. त्यानुसार आगारासाठी ५ एसटी बसेस तात्काळ उपलब्ध करून दिल्या जातील असा विश्वास दिला होता. त्यानुसार गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संगमनेर आगाराला ५ नवीन एसटी बसेस दाखल झाल्या.
खताळ म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री ना प्रताप सरनाईक, पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून ५ नवीन बसेस दाखल झाल्या. या नवीन बस मध्ये विधानसभा सदस्य यांच्यासाठी राखीव असलेल्या सीटवर बसून प्रवास करत शहर आणि वाहतुकीची पाहणी केली. प्रवाशांच्या समस्या सुटल्याने तसेच आगारात नवीन बस दाखल झाल्याने मला मनोमन आनंद होत आहे. खताळ म्हणाले की, मागील कालावधीत राज्य परिवहन महामंडळ तोट्यात गेले होते. परंतु उपमुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत.
महिलांना एसटी मध्ये ५० टक्के सवलत दिली गेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींचा एसटीकडे कल वाढला आहे. तोट्यात गेलेली लालपरी नफ्यामध्ये येत आहे. संगमनेर आगाराला लागणारा निधी आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून आ खताळ म्हणाले की एस टी बसमधून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशांनी बस स्थानक आणि बसची स्वच्छता राखावी असे आवाहन त्यांनी केले. आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांनी आमदार अमोल खताळ यांचा सन्मान केला. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे, माजी तालुका शहर प्रमुख रमेश काळे,राजेंद्र सोनवणे, शहरप्रमुख दिनेश फटांगरे अंकुश राहणे, श्याम राहणे, आर पी आय चे शहराध्यक्ष कैलास कासार, यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ यांनी लाल परीतून केला प्रवास या छोट्याशा प्रवासात त्यांनी वाहतुकीचे निरीक्षण करून यावर लवकर तोडगा काढला जाईल असेही सांगितले. यावेळी महायुतीच्या पदाधिकार्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. संगमनेर शहरातील वाहतूक समस्या गंभीर बनली आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार लवकरच शहरात स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यान्वित केली जाईल. आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविला जाईल असे खताळ यांनी सांगितले.