डॉक्टराचा प्रताप अल्पवयीनवर अत्याचार ; संगमनेर पोलीसांनी नाशिक मधून घेतले ताब्यात ,आज न्यायालयात करणार हजर ; नागरिकात तीव्र संतापाची लाट; उबाठा शिवसेनेने केली फाशीची मागणी
संगमनेर
खरंतर डॉ. हे धन्वंतरीला साक्षी ठेवून रुग्णांची काळजी घेतात सेवा देताना दिसून येतात. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिवस आणि एक दिवस आधीच अल्पवयीन मुलीला त्याच रूग्णालयात अत्याचाराला सामोरे जावे लागल्याच्या घटनेने वैद्यकीय क्षेत्रा बरोबरच शहरासह संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत घडलेली हकिकत अशी आहे की, संगमनेर येथील एका डॉक्टरने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने शहर पोलिसात डॉक्टरवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्या डॉ. चे नाव अमोल कर्पे वय 47 असून आपल्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला टेरेसवर नेवून तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारानंतर मुलीला सदर डॉ कडून दमदाटी करण्यात आली. ही घटना रविवार दि. ६ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ४ ते ५ या वेळेत घडली. डॉ. कर्पे यास नाशिक येथून शहर पोलीस पथकाने ताब्यात घेतले असून याप्रकरणी अत्याचारित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी डॉ. कर्पे वर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक फरनाहाज पटेल करीत आहेत. आरोपी डॉ अमोल कर्पे यांना आज न्यायलयात हजर केले जाणार आहे.
जनतेत तीव्र संतापाची लाट
शिवसेना आक्रमक फाशी देण्याची केली मागणी_
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या डॉ. अमोल कर्पे यांना फाशीची शिक्षा द्या . अशी मागणी अमर कतारी शिवसेना माजी शहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली. शिवसेना उबाठा व महिला आघाडीच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले मागणी म्हटले आहे की, डॉ अमोल कर्पे यांनी केलेल्या गैरकृत्या बदल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तालुक्यात आरोग्य क्षेत्रात सेवाभावी वृत्तीच्या डॉक्टर परंपरेला करपे यांनी काळीमा फासली. संबंधित पीडितेला न्याय मिळावा तसेच सदर प्रकरणाला फ़ास्टट्रॅक कोर्टात वर्ग करुन तातडीने चौकशी व्हावी आणि आरोपीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. करपे यांचा रुग्णालय परवाना तातडीने काढून घेण्यात यावा. २४ तासात डॉ आणि रुग्णालयावर कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने धडा आंदोलन छेडले जाईल. महिलांच्या सन्मानार्थ, कायदा व सुव्यवस्था मोडली तरी चालेल शिवसेना गप्प बसणार नाही असा सज्जड इशाराच देण्यात आला. संबंधित आरोपीला कोणतेही अभय न देता कठोरात कठोर शिक्षा द्यावी असे शिवसेना माजी शहर प्रमुख अमर कातारी युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण राजू सातपुते वेणुगोपाल लाहोटी दीपक साळुंखे ज्ञानेश्वर गायकर संकेत एखंडे शिवसेनेचे असिफ तांबोळी फैसल सय्यद विजू सातपुते प्रकाश गायकवाड अमोल डुकरे राजू सातपुते अनेक महिला पदाधिकारी यांनी दिला. सदर निवेदन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री, यांना पाठवण्यात आले. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी हॉस्पिटल बाहेर मोठी गर्दी केली होती परंतु पोलिसांचा बंदोबस्त असल्याने कोणतेही घटना घडली नाही.