भारत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेचे किमयागार ; माजी मंत्री थोरात

Blog Image
एकूण दृश्ये: 15
 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेचे किमयागार ;माजी मंत्री थोरात     अमेरिकेलाही भारतीय विचारवंताचा आविष्कार झाला पुन्हा क्रांती घडवण्याची गरज

   संगमनेर 

राष्ट्रपिता महात्मा गांधी व राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या भारतीय सुपुत्रांनी जगाला शांततेचा व समतेचा मंत्र दिला. मानवाच्या समान हक्कासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर लढले गेलेल्या संघर्षांमध्ये या दोन नेतृत्वाची प्रेरणा होती. सर्व संत,समाज सुधारक यांचे विचार एकत्र करून समतेची राज्यघटना निर्माण करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे किमयागार होते. त्यांनी दिलेली भारतीय राज्यघटनेची पायमल्ली होऊ देऊ नका याचबरोबर समता, बंधुता व स्वातंत्र्य हे तत्व जपा असे आवाहन लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गा तांबे, डॉ.जयश्री थोरात, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी.आर.कदम, श्रीमती कुसुमताई माघाडे, उत्कर्षा रुपवते, सुधाकरराव रोहम, रामहरी कातोरे, उपाध्यक्ष के.एस.गायकवाड, डॉ.शशिकांत माघाडे, सोमेश्वर दिवटे, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य बी.आर.कदम यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. 

थोरात म्हणाले की, ज्या लोकांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला नाही. ज्यांना तिरंगा मान्य नाही. अशी लोक राज्यघटना ही सत्तेसाठी पायरी समजत आहे. त्यांना पुन्हा जुने दिवस आणायचे आहेत. त्यामुळे राज्यघटनेची पायमल्ली होणार नाही. यासाठी प्रत्येकाने दक्ष राहिले पाहिजे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमधून जगामध्ये समतेच्या क्रांती झाल्या. अमेरिकेमध्ये काळा गोरा भेद मिटवण्यासाठी मार्टिन ल्युथर किंग यांनी क्रांती घडवली. तर दक्षिण आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेला यांनी मानवतेतील भेद मिटवण्याचा लढा दिला. आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवतेचा मंत्र जपणाऱ्या या महापुरुषांनी भारताला समतेची राज्यघटना दिली.

----- Advertisements -----

छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू,डॉ.आंबेडकर,सर्व संत, समाजसुधारक यांचा मानवतेचा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये उतरवला आहे. या महान विचाराचा अविष्कार अमेरिकेला झाला. हाच विचार सध्या धोक्यामध्ये आला आहे. पुन्हा क्रांती घडवण्याची गरज आहे. राज्यघटनेचा विचार सर्वसामान्य माणूस,शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक व प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवा. सध्या सोशल मीडियाचा वापर करून खोटे नाटे पसरवले जात आहे.

आ.सत्यजित तांबे म्हणाले की, भारतीय संविधान हा देशाचा विश्वास आहे. उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यघटनेने सदैव काम केले असून आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने भारताचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची नियुक्ती हा एक अभिमानाचा क्षण आहे. देशाचे संविधान ही जगातील सर्वोत्कृष्ट संविधान असून 75 वर्षांमध्ये 140 दुरुस्त्या झाल्या मात्र कधीही घटनात्मक पेच निर्माण झाला नाही हे या राज्यघटनेचे मोठे यश आहे.

याप्रसंगी विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुले आंबेडकर विचारांचे प्रा. डॉ.राहुल हांडे यांचे व्याख्यान झाले. सूत्रसंचालन गौतम गायकवाड यांनी केले. आभार डा शशिकांत माघाडे यांनी व्यक्त केले.

 

 

----- Advertisements -----

 

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin