भगवान महावीराच्या विचार तत्त्वांचा अंगीकार करण्याचा निर्धार; महावीर जयंती उत्साहात साजरी
संगमनेर
अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या विचार तत्त्वांचा अंगीकार करण्याचा निर्धार अनेकांनी व्यक्त केला. समस्त मानवजातीने अहिसेच्या मार्गाने जीवन जगले पाहिजे. गेली अनेक वर्षा पासून या मंदिरात जयंती जयंती साजरी केल्या जाते आता मंदिराला पन्नास वर्षे पूर्ण होत झाले आहे. त्या निमित्ताने वर्षभर या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. सकाळी मिरवणूक काढण्यात आली सुक्ष्म जिवांनाही वाचवण्याचा प्रयत्न भगवान महावीर यांनी केला. या विचारातून जीवदया मंडळाची निर्मिती झालेली आहे. संपूर्ण शहरात कत्तलखाने आणि मांसाहारी चे दुकाने बंद होती। दुपारी बारा ते तीन या दरम्यान महाप्रसाद वाटप करण्यात आला संध्याकाळी देवाची सुंदर सजावट करण्यात आली होती शहरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली महावीर जयंती निमित्त शहरातील जैन समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शोभायात्रे मध्ये शेकडो भाविक सहभागी झाले होते. शोभायात्रेमध्ये विविध धार्मिक झांक्यांद्वारे भगवान महावीरांच्या जीवनकार्याचे दर्शन घडवले. यावेळी स्थानिक जैन मंदिरात विशेष पूजेचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी भगवान महावीर जयंती निमित्त समाज बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे आयोजन जैन समाजाच्या विविध संघटनांनी संयुक्तपणे केले होते. या वेळी शहरातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_या मार्गे निघाली शोभायात्रा_*
जैन मंदिर, जैन स्थानक , कॅप्टन लक्ष्मी चौक ,रंगार गल्ली, जेपी रोड, बाजारपेठ, टेलीखुंड ,सय्यद बाबा चौक ,मेन रोड ,नगरपालिका महावीर पथ जैन मंदिर येथे समारोप करण्यात आला.