आऩंदोत्सवाने श्रीराम नवमी साजरी ; श्री राधाकृष्ण महाराजांनी दिले आशीर्वाद ;संध्याकाळी निघणार भव्य दिव्य मिरवणूक
संगमनेर
चैत्र शुध्द नवमी निमित्त श्रीराम मंदिरात दुपारी बारा वाजता अभिनव नगर नवीन नगर रोड येथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्म उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदार गुंजाळ, अपूर्व देशपांडे ,मौनी इथापे या दांपत्यानी रामल्ल्ला सीतामैयास अभिषेक करून त्यांच्या शुभहस्ते पूजा अर्चा करण्यात आली. पूजेचे पौरोहित्य निखिल उपासनी यांनी केले. महाआरती भक्तांना पंजेरी लापशीचा प्रसाद वाटप करण्यात आला. फटाक्यांचे आतषबाजी करण्यात आली. परमपूज्य गोवत्स रामायणाचार्य श्री राधाकृष्ण महाराज यांनी भक्तगणांना राम नवमी निमित्त शुभाशीर्वाद दिले. आरती नंतर भक्तगणांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन गणेश गुंजाळ, अमोल पिल्ले, मयूर जोशी यांनी केले. सायंकाळी सहा वाजता श्रीरामनवमी निमित्ताने विश्व हिंदू परिषद , बजरंग दल यांनी भव्य दिव्य शोभायात्रेचे नियोजन केले आहे.
शोभायात्रेत भव्य दिव्य धार्मिक देखावे, अयोध्येतील श्रीरामलल्लाची भव्य दिव्य मूर्ती, महाबली हनुमान मूर्ती, केरळ येथील पारंपारिक नृत्य व पारंपारिक वाद्ये, श्रीराम रथ, श्रीराम पंचायत, भजनी मंडळ, उज्जैन महाकाल डमरू पथक, तैजूर ढोल ताशा पथक, सनई- चौघडे, घोडे-उंट, आकर्षक रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी अशी भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रा मार्गः नवीन नगर रोड, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, चावडी, मेनरोड, सय्यद बाबा चौक, तेलीखुंट, नेहरू चौक, चंद्रशेखर चौक येथील मोठे मारुती मंदिर व श्रीराम मंदिर येथे महाआरती होवून शोभायात्रेची सांगता होईल. भव्य दिव्य शोभायात्रेत सर्व हिंदू बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विहिंप अहिल्यानगर जिल्हामंत्री विशाल वाकचौरे यांनी केले आहे. या मिरवणूकी मध्ये लहान अबाल, वयोवृद्ध, युवा वर्ग, सहभागी होणार आहेत.
प्रवरा संगमावर असलेल्या साई मंदिरात रामनवमी साजरी
साई मंदिर येथेही राम नवमी निमित्त रामनवमी साजरी करण्यात आली. "राम जन्मला ग सखे राम जन्मला" या गीत रामायणाच्या गाण्याने भक्तगण मंत्रमुग्ध झाले. गुरु राहुल कुलकर्णी यांच्या हस्ते आरती करून भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला. संपूर्ण मंदिर विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आले होती.