वन आणि जीवनातील हसमुख असलेले एवन व्यक्तिमत्त्व सुहासराव !*_
शब्दांकन शामलोचन
{सेवापूर्ती गौरव सोहळा}
वन उपासक सुहाषराव उपासनी यांचेकडे वनातील आणि जीवनातील प्रसंग अनुभवातीत आहे. आपल्या कार्याची तेजस्विता ( सुषमा ) वृध्दिंगत झाली ती आपल्या कर्तव्यदक्षतेने. आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सुहाषराव यांच्यावर शब्दरूपी (वर्षाव) होत तो त्यांच्या कार्याची पावतीच होय. खरे तर ,आपण या उपासनेतून जीवनाचे प्रतिपाद्य पूर्ण केलीत हेच वास्तव आहे !
आयुष्य जगण्याचा मतितार्थ काय असावा ? त्या विषयी उपासनी काका सांगतात. हे सर्व काही संस्काराने, ज्येष्ठ्यांच्या आप्त स्वकियांच्या आणि पूर्वजांच्या संचिताच्या फलिताने घडत असतं. केवळ कर्तव्य पार पाडावे म्हणून चालत नाही, तर त्यासाठी उपासनाच करावी लागते. उपासना करतो तोच उपसनी.
अनुभव सांगतांना ते म्हणतात की, मी 1994 ला वनविभागात नोकरीस सुरुवात केली. तब्बल तीस वर्ष मी कार्यरत नव्हे तर क्षणोक्षणी या वनात रत होत गेलो. रममाण होता आले पाहिजे असे ते ठामपणे सांगतात. नोकरी आली म्हणजे पर्यायाने बदली आली. माझी बदली 2001 साली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे झाली. खरे तर वन विभागातील नोकरी करणे म्हणजे स्वत:ला भाग्य समजतो मी! माणसाने वनात वावरावे, निसर्गात वावरावे ती एक वेगळी जादू आहे, किमया आहे. ज्येष्ठ साहित्यिक वन्यजीव अभ्यासक मारूती चित्तमपल्ली हे माझे आदर्श होत.
सजीव सृष्टी काय असते, त्या वन्यप्राण्या जवळ गेल्याशिवाय त्यांचे विश्व, भावविश्व कसे कळणार ? त्यांच्या विषयी अभ्यास करायचा असेल तर जवळच जाव लागतं. अनेक हिस्र श्वापद जवळून बघितले मी! यातूनच साप पकडण्याची कला मला आत्मसात करता आली. मी एक प्रकारे सर्पमित्रच झालो. पुढे 2005 साली कामाला सुरूवात केली. हे विश्व चराचर सृष्टीशी निगडीत आहे. ते कदापि नष्ट झाले नाही पाहिजे. याठिकाणी मी वन्यप्राणी यांच्या शिकारीस आळा घालून वनसंवर्धनाला मह्त्त्व दिले. माणसाने आयुष्याच्या शेवटच्या क्षणा पर्यत शिकत राहावे. या निसर्गाने मला खूप शिकवले. न संपणारी अनुभावाची मोठी शिदोरी दिली. 2006 मध्ये शहापूर येथे प्रशिक्षणासाठी बदली झाली. तर एकाच वर्षात म्हणजे 2007 साली संगमनेर वनविभाग भाग-1 येथे निमज ला बदली झाली. इथला प्रकल्पच पथदर्शी ठरला आहे. संगमनेर खुर्द रोपवाटिकेची माझ्यावर जबाबदारी असताना आमदार रोहयो समिती (स्थानिक स्वराज्य कमिटी) माध्यमातून त्यांनी रोपवाटिका पाहणी केली असता माझ्या कार्यपध्दतीवर उत्कृष्ट शेरा दिला. अन्य मतदारसंघात अशा पद्धतीची रोपवाटिका बनवण्यासाठी सूचना केल्या. 2020-साली वनपाल संवर्गात पदोन्नती होऊन पानोडी संगमनेर भाग-3 येथे बदली झाली. तेथूनच 28 फेब्रुवारी 2025 झाली सेवानिवृत्त झालो. हे सांगत असतांनाच ते म्हणाले,
गाव तिथे रान असतं, वन असत. गाव पातळीवर सर्वांना विश्वासात घेऊनच योग्य तीन कामे केलीत अन ती प्रत्येकाने केलीच पाहिजे. ती करताही आली पाहिजे. वनविभागात काम करत असताना नेहमी चांगलेच अनुभव आले. तसे वाईट अनुभव जीवनाच्या गाठी सोबत आहे. वाईट गोष्टी मनात ठेवू नये. नव्या पिढीला संदेश देण्या बाबत ते सांगतात की, मी वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे.
जीवनात कष्टाशिवाय पर्याय नाही. अनुभवानेच माणूस शिकतो किंबहुना महत्त्वपूर्ण अनुभव हेच शिक्षण होय असे शिक्षणा विषयी आपले मत ते व्यक्त करतात. आपल्या जीवनाला यातूनच खरी दिशा मिळते असे ठामपणे ते सांगतात. सहचारिणी ही गृहिणी असल्यास घराला घरपण येतं मुले सुशिक्षीत सुसंस्कारित होतात ती तशीच असावी. माझी स्नुषा वर्षा ही वैद्यकीय क्षेत्रात असून शासकीय नोकरी करते. तर मुलगा अजिंक्य हा वकिली करतो. पूर्वजांच्या आशीर्वादाचे फलित यापेक्षा काय वेगळे असू शकते? अशा उपज वंशावळीत येण्यासाठी सत्कृत्य करावे लागते .पुढची पिढी हीच आपला आधार आहे असा मनोदय व्यक्त करतांना जीवन हे सार्थकी लागले असे ते आत्मविश्वासने सांगतात.
आधुनिक काळात प्रगती करत असताना पर्यावरणास हानी पोहोचणार नाही याची दक्षता घेतली गेली पाहिजे. आरोग्य आणि पैसा हे दोन्ही परस्पर विरोधी संकल्पना आहेत .सामान्य लोक हे पैसे देऊन वनात सहलीला येतात पण आम्ही पैसे न मोजता पर्यावरणाच्या सान्निध्यात जीवन व्यतीत केले. त्यामुळे आर्थिक संपत्ती गौण असून आरोग्य धनसंपदा हीच मोठी आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवन कार्यमग्न असावे. मृत्यू ही विश्रांती असे माझे मत आहे. त्यामुळे निवृत्ती माझ्या मनालाही पटतं नाही. निवृत्ती नंतर नोकरीत असताना ज्या गोष्टी करता आल्या नाहीत अथवा बाहेर फिरायला जमले नाही त्या ठिकाणी आवर्जून फिरायला जाणार आहे. ते म्हणतात तीस वर्ष या वनवैभवाशी माझे नाते जोडले होते, नाळ जोडलेली आहे. ती वन संवर्धनासाठीच काम करणार असल्याचे ते म्हणाले. कारण वनसाधनेचे अंतरंग कायम माझ्या सोबत असेल !!! शेवटी समष्टी आपल्या विषयी अशीच म्हणेल असा आशावाद बाळगला पाहिजे सुखी जीवनाच्या संसार वेलीवर आपण अजिंंक्य ठरावे !!!
शुभेच्छूक एक हितेषी