शहिद वीरपुत्र रामदास बढे यांच्यावर होणार शासकीय इतमामात अंतिम संस्कार
संगमनेर प्रतिनिधी
जम्मू काश्मीर मधील तंगधार सेक्टर मध्ये 24 मार्चला कर्तव्य बजावताना वीर पुत्र रामदास साहेबराव बढे हे शहीद झाले आहेत. त्यांचे पार्थिव 26 मार्च 2025 रोजी, सकाळी त्यांचे मूळ गाव मेंढवन तालुका संगमनेर येथे आणणार आहेत. सकाळी दहाच्या दरम्यान लष्करी इतमामा मध्ये त्यांना सन्मानपूर्वक अखेरचा निरोप दिला जाणार आहे. भारत मातेच्या सेवेसाठी जम्मू काश्मीर, तंगधार येथे आपल्या प्राणांची आहुती देणारे संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील वीर सुपुत्र शहीद मेजर रामदास साहेबराव बढे यांचे पार्थिव आज मुंबई विमानतळावर पोहोचले. या दुःखद प्रसंगी आमदार अमोल खताळ यांनी अंतिम दर्शन घेत या वीर पुत्र रामदास साहेबराव बढे यांचे बलिदान हे देशासाठी अमूल्य आहे आणि त्यांच्या शौर्याची आठवण कायम आमच्या हृदयात राहील अशी कृतज्ञतापूर्वक भावना व्यक्त केली. बुधवारी अंतिम सलामी साठी सर्व माजी सैनिक मित्र संगमनेर, राहाता, अकोले, सिन्नर श्रीरामपूर, कोपरगाव,सर्व आजी माजी सैनिक मित्र परिवार पदक लावून मोटार सायकल रॅलीसाठी एक तिरंगा झेंडा गाडीला बाधून कोकणगाव ते मेढवन पर्यंत सन्मान रॅली होईल या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. २४ मार्च २०२५ ला कर्तव्यावर असतांना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. या मध्ये या वीरयोध्याला वीरमरण प्राप्त झाले .रामदास बढे हे हवालदार म्हणून युनिट- ३४ (एम) एफडी रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. जम्मू- काश्मीर मधील तंगधार जिल्ह्यात ऑपरेशनल ड्युटी करत असताना नियंत्रण रेषेवर या सैनिकाला वीरमरण आले. २६ मार्च २०२५ रोजी दुपारी १ वाजता कमळेश्वर मेंढवण या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
भारतीय लष्करात हवालदार पदावर असलेल्या रामदास साहेबराव बडे या वीर जवानास काश्मीर खोऱ्यात वीरगती प्राप्त झाली काश्मीर खोऱ्यातील तंगधार या ठिकाणी पाकिस्तान कडून जोराचा गोळीबार सुरू असतांना त्यास प्रतित्युत्तर देत असतांना बढे यांना गोळी लागली त्यात ते गंभीर जखमी झालेघ टनेत बडे यांना वीरमरण प्राप्त झाले.