भारत

स्टेजला आग, दोघे जखमी; मालपाणी हेल्थ क्लब मधील घटना

Blog Image
एकूण दृश्ये: 281

स्टेजला आग, दोघे जखमी; मालपाणी हेल्थ क्लब मधील घटना

         संगमनेर प्रतिनिधी

शहराजवळील कासारा दुमाला शिवारातील मालपाणी हेल्थ क्लब आणि पॅलेस मध्ये एका कार्यक्रमासाठी तयार करण्यात येत असलेल्या स्टेजला दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मालपाणी हेल्थ क्लबमध्ये अनेक विवाह सोहळे आयोजित केले जातात. अशाच एका विवाह सोहळ्यासाठी भव्य स्टेज बांधण्याचे काम अंतिम टप्पात असतांना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सजावटीला अचानक आग लागली. या घटनेने सर्वत्र धुराचे लोळ सर्वत्र दिसू लागले. एवढेच नव्हे तर बांधलेले स्टेज पूर्णत; जळून खाक झाले आहे. आगीचे वृत्त समजताच हेल्थ क्लबचे कर्मचारी व परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका हेल्थ क्लबमध्ये पोहोचली. सर्वांच्या प्रयत्नाने आग विझवण्यात आली. परंतु या मध्ये दोघे गंभीर जखमी झाले. स्टेज बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या थर्माकोलला आग लागल्याने हा अपघात झाला. पोलिस उप अधिक्षक डॉ कुणाल सोनवणे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी सदर घटनेचे निरीक्षण केले. या दुर्देवी घटनेत परराज्यातून सजावटीसाठी आलेले दोन बंगाली कामगार चांगलेच भाजले. त्यांना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांना पुढील उपचारासाठी पीएमटी लोणी येथे पाठविण्यात आले आहे. या अपघातात पश्चिम बंगालचे रहिवासी आहे. तुषार तपन दलाल 24 परगणा याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

समजूतदारपणा ही जीवनाची खरी शिकवण आहे.

संत तुकाराम
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin