भारत

संगमनेर मध्ये श्रीराम कथेचे आयोजन ;

Blog Image
एकूण दृश्ये: 34

संगमनेर मध्ये श्रीराम कथेचे आयोजन ; मालपाणी लॉन्स मध्ये चालणार नऊ दिवस धार्मिक उत्सव.. श्रीरामललाचा विवाह सोहळा - मिरवणूक असेल मुख्य आकर्षण 

          संगमनेर { प्रतिनिधी }

श्रीराम नवमीचे औचित्य साधून संगमनेर येथे श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. परमपूज्य गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज या़ंच्या सुमधुर रसाळ वाणीतून श्रीराम कथेचे वाचन होणार असून १ ते ९ एप्रिल दरम्यान नऊ दिवस दुपारी ३ ते सायंकाळी  ६:३० दरम्यान मालपाणी लॉन्स येथे हा धार्मिक उत्सव संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. 

     या श्रीराम कथेचे आयोजन श्रीराम कथा आयोजन समिती समस्त भक्तगण संगमनेरकर यांनी केले आहे. परमपूज्य गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या सुमधुर अशा रसाळ वाणीतून तमाम संगमनेर वासीयांसाठी श्रीराम कथा श्रवण करण्याचे सौभाग्य प्राप्त होणार आहे. या कार्यक्रमाचा आनंद व्दिगुणित करण्यासाठी तसेच त्यांच्या अमृतवाणीतून पंचक्रोशीतील समस्त संगमनेरकर हा आनंद व्दिगुणित करण्यासाठी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.  तब्बल नऊ दिवस चालणारा हा भक्ती उत्सव आपल्या सर्वांना संत दर्शन हर्षोल्हास समागम आणि आनंदाचे अलौकिक संगमाकडे घेऊन जाणारा ठरणार आहे.

या  महन्मंगल श्रीराम कथेच्या श्रवणातून आपले जीवन मंगलमय आणि आनंदीत करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले असून आग्रहाचे निमंत्रण म्हणून परमपूज्य गोवत्स राधाकृष्णजी महाराजजींच्या सानिध्यात भव्य दिव्य शोभायात्राही काढण्यात येणार आहे.

शोभायात्रा १ एप्रिलला सकाळी ८:३० वाजता होणार असून ३ तारखेला या महन्मंगल उत्सवामध्ये श्रीराम जन्मोत्सव कथेच्या वेळात होणार आहे. ४ एप्रिलला युवा वर्गासाठी कथा प्रसंगांमध्ये पहिला दिवस श्रीराम कथा महात्मे, दुसरा दिवस शिव पार्वती विवाह, तिसरा दिवस श्री राम जन्मोत्सव, चौथा दिवस बाललीला आणि धनुष्य यज्ञ ५ एप्रिल ला पाचव्या दिवशी श्रीरामलला आणि माता जानकी यांचा भव्यदिव्य विवाह सोहळा संपन्न होणार असून सायंकाळी मिरवणूक हे मुख्य आकर्षण ठरणार आहे, सहावा दिवस वनवास प्रसंग संवाद , सातवा दिवस श्रीराम भरत ; भरत शबरी भेट, आठवा दिवस रामचरित्र लंका विजय ,नववा दिवस श्री राम राज्याभिषेक होणार आहे.‌

 शोभायात्रेचा मार्ग  मंगळवार में १ एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजता चंद्रशेखर चौक ,श्रीराम मंदिर, नेहरू चौक, बाजार पेठ, तेली खुंट, नगर पालिका, मेन रोड,  बालाजी मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, क्षत्रिय समाजाचे विठ्ठल मंदिर, या मार्गावरून शोभायात्रा निघेल

{ कथेचे आहेत सात सोपान } त्यामध्ये बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्कींधाकांड, सुंदर कांड, लंकाकांड, उत्तराकांड यामधून मौलिक मार्गदर्शन मिळणार असून भक्तगणा साठी ही बौध्दिक धार्मिक मेजवाणी फलद्रुप ठरेल .

----- Advertisements -----

जीवनात यशस्वी होण्यासाठी धैर्य आवश्यक आहे.

सावरकर
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin